व्हिडीओ काढायच्या नादात पाण्याला हलक्यात घेतलं, व्हिडीओ व्हायरल!
पाण्याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही. पाणी किती खोल आहे. आपण ज्या जागेत उभे आहोत तिथे ते जितकं खोल आहे तितकंच सगळ्या भागात असेल असं आपण गृहीत धरतो.
बरेचदा वयाने मोठे असणारे लोकं आपल्याला एक गोष्ट सतत सांगत असतात, “पाण्यापासून लांब राहा, पाण्यात जाऊ नको”. आपल्याला ऐकताना वाटतं, “अरे काय ही काय सांगायची गोष्ट आहे का. आम्ही काय लहान आहोत का?” खरं तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. पाण्याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही. पाणी किती खोल आहे. आपण ज्या जागेत उभे आहोत तिथे ते जितकं खोल आहे तितकंच सगळ्या भागात असेल असं आपण गृहीत धरतो. मग अनेकदा याच गृहीत धरण्याने अपघात होतात. पोहायला गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू वगैरे अशा घटना कानावर पडतात. त्या या अशाच पाण्याच्या चुकीच्या अंदाजमुळे! हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघा…
व्हिडिओ
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या उद्यानात पावसाचे भरपूर पाणी आहे. एक मुलगी तिथे पोहोचते आणि नाचू लागते.इथे ती पावसाळ्याचा चांगलाच आनंद घेताना दिसतीये.
याच वेळी तिच्यासोबत असं काही घडतं, त्यानंतर आता पावसात निघण्यापूर्वी ती शंभर वेळा तरी नक्कीच विचार करेल.
सोशल मीडियामुळे व्हिडीओ, फोटो काढायची प्रचंड क्रेझ आलीये. पावसाळा तर सगळ्यांचा आवडता ऋतू. ज्यांना व्हिडीओ काढायची, फोटो काढायची आवड ते तर हा ऋतू सोडतच नाहीत.
ही मुलगी बघा, छान व्हिडीओ काढायचा म्हणून हा सगळा अट्टाहास! व्हिडीओ नीट बघा, ती आधी छान उड्या मारतीये. तिला वाटत आपल्याला पाणी आत्ता जितकं खोल वाटतंय तितकंच खोल सगळ्या भागात असेल.
उड्या मारत मारत ती तलावाच्या पलीकडच्या बाजूला जाते. हे पावसाचं साचलेलं पाणी आहे. या पाण्याचा अंदाज तिला येत नाही. जसं ती पलीकडे पाऊल टाकते ती पाण्यात खोलवर बुडते.