गाडी पार्किंगमधून काढताना येत होत अडचण, काय केलं बघा पठ्ठयानं!
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला अनेक गाड्या उभ्या आहेत.
तुम्ही पाहिलंच असेल की, काही लोक आपली गाडी पार्किंगमध्ये अशा प्रकारे पार्क करतात की, दुसरी गाडी काढायला जागाच उरत नाही. अशावेळी दुसऱ्या गाडीचा मालक आला की, पार्किंगच्या जागेतून गाडी काढताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. पण यात त्या व्यक्तीने पार्किंगमध्ये पार्क केलेली आपली गाडी काढण्यासाठी असं काही केलं आहे, ज्यामुळे तुम्हालाच धक्का बसेल. हा माणूस आधी सायकलप्रमाणे गाडी उचलून हलवतो, मग तिथून पुढे सरकवतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला अनेक गाड्या उभ्या आहेत. त्याचबरोबर दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत. इतक्यात एक माणूस तिथे येतो आणि काळ्या रंगाची गाडी काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र जागेअभावी बाहेर पडणे शक्य होत नाही.
ट्विटरवर हा आश्चर्यकारक व्हिडिओ @Enezator नावाच्या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. यूजरने लिहिले, काय आश्चर्यकारक आउटपुट आहे. एक दिवसापूर्वी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ येताच इंटरनेटवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
excellent output pic.twitter.com/MBIM9GJM1w
— Great Videos (@Enezator) January 9, 2023
बातमी लिहिताना हा व्हिडिओ 12 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर जवळपास 19 हजार लोकांनी लाईक केला आहे. याशिवाय ट्विटर युजर्सही तीव्र प्रतिक्रिया नोंदवत आहेत.