Nivati Rocks: सिंधुदुर्गातील निवतीच्या खडकांतून पाण्याचा मोठा फवारा; अद्भुत दृश्याचा व्हिडीओ व्हायरल

बोटीवर बसलेल्या लोकांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये मोठ्या खडकांतून फवारांच्या रूपात पाणी बाहेर येत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ रिट्विट केला असून तो आतापर्यंत 16,800 पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Nivati Rocks: सिंधुदुर्गातील निवतीच्या खडकांतून पाण्याचा मोठा फवारा; अद्भुत दृश्याचा व्हिडीओ व्हायरल
Nivati Rocks Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 10:54 AM

कोरोना महामारी आणि लॉकडाउनमधील निर्बंधांमुळे जवळपास गेली दोन वर्षे लोकांना घरातच राहावं लागलं होतं. या दरम्यान काही मोजक्याच लोकांना इतर ठिकाणी जाता आलं, फिरता आलं. पण आता जवळपास सर्व निर्बंध हटवण्यात आले असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता लोक घराबाहेर पडून फिरायला जाऊ लागले आहेत, विविध ठिकाणांना भेट देऊ लागले आहेत. अशातच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांना एक अप्रतिम ठिकाण आणि दृश्य पाहायला मिळत आहे. (Nivati Rocks)

या ठिकाणाला ‘निवती खडक’ म्हणतात. बोटीवर बसलेल्या लोकांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये मोठ्या खडकांतून फवारांच्या रूपात पाणी बाहेर येत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ रिट्विट केला असून तो आतापर्यंत 16,800 पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओमध्ये हर्ष गोएंका यांना टॅग करत डॉ. मधु टेक चांदनी नावाच्या महिला ट्विटर युजरने लिहिलं की, “महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याच्या काठावर असलेल्या या जागेला ‘निवती रॉक्स’ म्हणतात. पाण्याच्या लाटेमुळे खडकांमधून हा फवारा तयारा होतो. हे अद्भुत आहे”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

विशेष म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निवती किल्ला बांधण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वेबसाइटनुसार कार्ली खाडीपासून सागरी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ते बांधण्यात आलं होतं. Condé Nast Traveller च्या मते, निवती खडक समुद्राच्या मध्यभागी आहेत आणि किल्ल्याच्या शिखरावरून समुद्राचं अद्भुत दृश्य दिसतं. त्या ठिकाणी एक लाइटहाऊससुद्धा आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.