काकांचा कहर! थंडीपासून बचाव करण्यासाठी बघा काय केलं …
थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत.
सध्या दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे . दरम्यान, थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. मात्र, थंडीची लाट एवढी आहे की, उबदार कपडेही या थंडी समोर कमी पडततायत. अशा परिस्थितीत लोक अंगावर भरपूर कपडे घालत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने अंगावर इतके कपडे घातले आहेत की तुम्ही मोजून थकून जाल.
काही लोक बांधकामाच्या ठिकाणी काम करत आहेत. यादरम्यान, एका व्यक्तीला आपल्या सहकारी मजुराला पाहून धक्का बसतो. कारण त्या माणसाने थंडीपासून वाचण्यासाठी अशी तयारी केली होती, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
वास्तविक, त्या व्यक्तीने एक, दोन नव्हे तर अनेक टोप्या घातल्या होत्या. त्याचप्रमाणे, थंडीपासून वाचण्यासाठी, एका वर एक शर्ट घातल्यानंतर, त्याने अनेक स्वेटर देखील घातले. हे पाहून सहकारी मजुराने त्या व्यक्तीचे कपडे मोजलेच नाही तर त्याचा व्हिडिओही बनवला आणि व्हायरल केला.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की त्या व्यक्तीने सुमारे 10 टोप्या घातल्या आहेत. याशिवाय त्याचे शरीर त्याने 18 कपड्यांनी झाकलेले आहे.
आता हा व्हिडीओ पाहून अंदाज येतो की लोक थंडीचा त्रास टाळण्यासाठी काय काय करतात. भरपूर उबदार कपड्यांपासून ते रूम हिटरपर्यंत, लोक थंडीपासून वाचण्यासाठी विविध उपाय करत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. आता तुम्हीही मोजा आणि सांगा काकांनी थंडीपासून वाचण्यासाठी अंगावर किती कपडे घातले आहेत.