Video | पुष्पाची जादू! ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नरचं श्रीवल्लीवर Reel, Instaवर अल्लू अर्जुनचीही कमेंट

Pushpa The Rise : ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये पुष्पा सिनेमाचे रील्स, पोस्ट आणि वेगवेगळ्या गाण्याचे सीन रीक्रीएट करणाऱ्यांनी धुमाकूळ घातलाय.

Video | पुष्पाची जादू! ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नरचं श्रीवल्लीवर Reel, Instaवर अल्लू अर्जुनचीही कमेंट
डेविड वॉर्नरच्या रीलमधील Screenshot
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 7:31 PM

डेव्हिड वॉर्नर! ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातला आघाडीचा खेळाडू. आता अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमानं डेविड वॉर्नरलाही (David Warner) वेड लावलंय. डेविडनं आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरुन चक्क श्रीवल्ली (Sreevalli) आणि सामी-सामीचे (Saami saami) रिल्स रेकॉर्ड केले आहे. हे रील्स पाहून फक्त डेविड वॉर्नरचे चाहतेच नव्हे तर चक्क अल्लू अर्जुननंही डेविड वॉर्नरच्या रिल्सवर कमेंट केली आहे. सोशल मीडियावर सध्या पुष्पाच्या गाण्याच्या रिल्सचा ढीग पडलाय. अनेकांनी आपआपल्या स्टाईलमध्ये पुष्पाच्या सिनेमाचे रिल्प बनवून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरुन शेअर केले आहेत. सिनेमाला राज्यांची, देशाची सीमा नसते, हे यावेळी पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आधी किली पॉलनं पुष्पाच्या सिनेमाचे रिल्स केले होते. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नरलाही पुष्पा सिनेमानं आपल्या प्रेमात पाडलंय. डेविड वॉर्नरलं खास आपल्या स्टाईलमध्ये हटके रील्स शेअर केलेल असून या रील्सवर आता सुपरस्टार अल्लू अर्जुननही कमेंट केलंय. त्याच्या या कमेंटवर डेविड वॉर्नरनेही रिप्लाय केलाय.

पाहा डेविड वॉर्नरचं रील –

दरम्यान, फक्त डेविड वॉर्नरच नाही, तर त्यांच्या मुलांनीही पुष्पाच्या गाण्यांवर रील्स केले आहेत. डेविड वॉर्नरच्या मुलींनी पुष्पा सिनेमातील रश्मिका मंधानाच्या सामी सामी या गाण्यावर रील केलं आहे. स्विमिंग कॉस्च्युममध्ये डेविडच्या मुलींनी सामी सामी गाण्यावर ठुमके लगावले आहे. आई वडिलांआधी मुलींनी सामी सामीवर ठेका धरला असल्याचं डेविडनं पोस्टमध्ये लिहिलंय. दरम्यान, हा व्हिडीओ अल्लू अर्जुनलाही आवडला असून त्यानं या व्हिडीओवरही कमेंट केलंय. सो क्युट असं म्हणत अल्लु अर्जुननं डेविड वॉर्नरच्या मुलींचं कौतुक केलंय.

सामी सामीवरही रील – पाहा व्हिडीओ

मूळच्या तेलुगुमध्ये असलेल्या पुष्पा द राईज या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये पुष्पा सिनेमाचे रील्स, पोस्ट आणि वेगवेगळ्या गाण्याचे सीन रीक्रीएट करणाऱ्यांनी धुमाकूळ घातलाय. सोशल मीडियात पुष्पा दी राईज सिनेमाच चांगलात गाजत असून प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगलंच डोक्यावर घेतलंय. मल्याळम, तमिळसह हिंदीतही पुष्पा दी राईज सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर या सिनेमानं आपल्या स्पर्धेत पहिला नंबर काढत बॉक्सऑफिसवर तगडी कमाईदेखील करुन दाखवली होती.

संबंधित बातम्या :

Video | 130च्या स्पीडनं बाईक चालवणं महागात पडलं, रस्त्याच्या मधोमध कारचा सुपरबाईकची धडक!

‘मोनिका, ओह्ह माय डार्लिंग’ नेव्हीच्या सैनिकांनी खरंच हे गाणं रिहर्सलमध्ये वाजवलं? बघा अफलातून Video

Viral : संकटातही विचलित न होता कसं पडायचं बाहेर? या Videoतून खूप काही शिकायला मिळेल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.