कहानी सिनेमाचा (Kahaani Movie) पहिला भाग जर तुम्ही पाहिला असेल, तर त्यात एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. या कॅरेक्टरच्या फोनवर एका विशिष्ट माणसाचा पत्ता आणि फोटो येतो. त्यानंतर माथेफिरु दाखवलेलं हे कॅरेक्टर त्याचा थेट खून करतं. हे तेच कॅरेक्टर आहे जे विद्या बालनला कहानी सिनेमाच्या पहिल्या भागात ट्रेनसमोर धक्का देताना दिसलंय. असा डिट्टो प्रकार खराखुरादेखील घडला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून ही घटना अंगावर काटा आणणारी होता. समोरुन मेट्रो येतेय, हे पाहून एकानं रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेना प्लॅटफॉर्मवरुन थेट खाली ढकललं. ही घटना घडली ब्रुसेल्समध्ये! ब्रुसेल्समध्ये ट्रेनची वाट पाहत काही प्रवासी थांबले होते. दरम्यान, काळ्या रंगाच्या कपड्यात असलेल्या एका इसमानं एका महिलेला मागू जोरदार धक्का दिला. पण हा धक्का बरोबर ट्रेन येतेय, हे पाहून देण्यात आला होता.
समोरुन येणाऱ्या ट्रेनखाली चिरडून महिलेचा जीव घेण्याचा प्रयत्न या माथेफिरुनं केल्याचं स्पष्टपणे सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये कैद झालं आहे. घडलेला प्रकार पाहून सगळेच थबकले होते. महिला थेट तोंडावरच रेल्वे रुळांवर आपटली. हा प्रकार घडताक्षणी रेल्वेचालकानं प्रसंगावधान राखलं म्हणून मोठा अनर्थ टळला. महिलेला रेल्वे रुळावर ढकलल्याचं पाहून रेल्वे चालकानं तातडीनं रेल्वे जागच्या जागी थांबवली. यानंतर महिलेला धक्का देणारा पसार झाला. रेल्वे थांबल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला बाहेर काढलं.
A man deliberately pushes a woman onto the metro tracks at Rogier station in Brussels ⚠️ pic.twitter.com/GXMtEYaVmf
— Julia Cassandra ? (@Jul101Vie) January 15, 2022
दरम्यान, याप्रकरणी ब्रुसेल्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानतेचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे ब्रुसेल्सच्या पोलीसांनी तत्काळ या घटनेची गंभीर दखल घेत काही मिनिटांच्या आतच महिलेला रेल्वेखाली ढकलणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आला आहेत. ही घटना नेमकी केव्हा घडली हे कळू शकलेलं नाही. मात्र कोरोना काळातील महामारीदरम्यानच ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जाते आहेत. प्लॅटफॉर्मवरील सर्व लोकांच्या चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे ही घटना गेल्या काही दिवसांतलीच असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.
CCTV VIDEO | पुण्यात दिवसाढवळ्या गँगवॉर, दोघांचा मृत्यू, गोळीबाराची भीषण दृश्यं सीसीटीव्हीत कैद
CCTV VIDEO | मटण शॉपमधून 9 बकरे चोरीला, दुसऱ्यावर आळ घेण्याचा डाव सीसीटीव्हीमुळे फसला