समुद्राच्या लाटांचा अंदाज आला नाही, मुलगी बघता बघता गायब! भयानक व्हिडीओ
जिथे आपल्याला धोका आहे त्या ठिकाणाहून लवकरात लवकर दूर जाणे शहाणपणाचे आहे आणि दु:ख आणि त्रास कधीच सांगून येत नाहीत अशी एक म्हण देखील आहे. असेच काहीसे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले, एक मुलगी समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढत होती. मग अचानक मोठी लाट आली आणि लाट त्या मुलीला सुध्दा घेऊन गेली. शेवटी काय घडलं याचा व्हिडिओ बघा.
मुंबई: धाडसी असणे आणि आपल्या भीतीवर विजय मिळवणे ही एक खूप चांगली गोष्ट आहे. परंतु, जोखीम पत्करून शौर्य दाखवणे नेहमीच शहाणपणाचे नसते. जेव्हा तुमचे नशीब खराब असते, तेव्हा एखादी छोटीशी गोष्ट तुमच्यासाठी समस्या बनू शकते. कधीकधी ते जीवघेणं देखील असू शकते. जिथे आपल्याला धोका आहे त्या ठिकाणाहून लवकरात लवकर दूर जाणे शहाणपणाचे आहे आणि दु:ख आणि त्रास कधीच सांगून येत नाहीत अशी एक म्हण देखील आहे. असेच काहीसे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले, एक मुलगी समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढत होती. मग अचानक मोठी लाट आली आणि लाट त्या मुलीला सुध्दा घेऊन गेली. शेवटी काय घडलं याचा व्हिडिओ बघा.
समुद्राच्या लाटांचा अंदाज आला नाही
नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये धोकादायक लाटांचे स्पष्ट दृश्य दिसून आलंय. एक मुलगी उंच लाटेत वाहून गेल्याची भयानक घटना समोर आली आहे. सुदैवाने ती दुसऱ्या पर्यटकामुळे बचावलीये. या व्हिडीओमध्ये ही मुलगी किनाऱ्याजवळ उभी आहे. या मुलीला मोठ्या लाटेचा अंदाज येत नाही. इथे ही मुलगी फोटो काढायला उभी आहे. अचानक तिथे इतकी मोठी लाट येते की मुलगी अचानक नाहीशी होते. हे दृश्य फार भयानक आहे.
Child swept off pier rescued by quick-thinking bystander pic.twitter.com/KChycr3EJR
— Insane Reality Leaks (@InsaneRealitys) August 17, 2023
या धक्कादायक व्हिडिओमुळे माझी झोप उडेल
जेव्हा उंच लाट येते तेव्हा त्या मुलीला अंदाज येत नाही, तिचं लक्ष नसतं. ती उभी असताना तिला समतोल राखणं कठीण जातं लाटेसोबत वाहून जाताना ती इकडे तिकडे पकडायचा खूप प्रयत्न करते. पण लाट इतकी मोठी असते की तीव्र दिसत होती की मुलगी सहजच वाहून जाते. स्टीलची पट्टी पकडली तरी तिचे हात घसरतात आणि ती उंच लाटेत वाहून जाते. दरम्यान, आणखी दोन जण मुलीच्या दिशेने जातात, परंतु जोरदार लाटांमुळे ती दुसऱ्या बाजूला सरकते. सुदैवाने एक पर्यटक दुसऱ्या बाजूला धावतो आणि एका हाताने मुलीला पकडतो तर दुसऱ्या हाताने स्टीलचे हँडल धरतो. तो ताबडतोब मुलीला ओढून सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला गेलाय.