Video : ‘मेरे जिजा जी’ म्हणत तरूणींचा जबराट डान्स, दाजीच्या स्वागतासाठी मेव्हण्या थिरकल्या…

| Updated on: May 09, 2022 | 8:30 AM

सध्या एका लग्नाचा व्हीडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वराच्या मेव्हण्या म्हणजे वधूच्या बहिणी स्वागतासाठी जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत.

Video : मेरे जिजा जी म्हणत तरूणींचा जबराट डान्स, दाजीच्या स्वागतासाठी मेव्हण्या थिरकल्या...
viral dance
Follow us on

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हीडिओ (Wedding Video) पाहायला मिळत आहेत. सध्या एका लग्नाचा व्हीडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वराच्या मेव्हण्या म्हणजे वधूच्या बहिणी स्वागतासाठी जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत. या व्हीडीओमध्ये वर लग्नाच्या ठिकाणी दारात उभा आहे. या त्याच्या मेव्हण्या त्याचं डान्स करत स्वागत करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत (Viral Video) आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एका लग्नाचा व्हीडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वराच्या मेव्हण्या म्हणजे वधूच्या बहिणी स्वागतासाठी जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत. या व्हीडीओमध्ये वर लग्नाच्या ठिकाणी दारात उभा आहे. या त्याच्या मेव्हण्या त्याचं डान्स करत स्वागत करताना पाहायला मिळत आहेत. वधूच्या बहिणी ‘मेरे जिजा जी’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ ‘द भंडारी पॅलेस’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जुना आहे, पण सध्या तो पुन्हा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही वराच्या स्वागतासाठी ‘ओ मेरे जिजाजी’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. याला लाखो लोकांनी पाहिलंय तर पन्नास हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

लग्नातल्या डान्सचा आणखी एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवरी मुलगी डान्स कराताना दिसतेय तिच्यासोबत तिच्या सहा मैत्रिणीही पाहायला मिळत आहेत. हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हीडिओत वधू आणि तिच्या मैत्रिणींनी पलक तिवारीच्या ‘बिजली’ गाण्यावर डान्स करत आहेत. हा डान्स एवढा भारी आहे की हा व्हीडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. वधू आणि तिच्या 6 मैत्रिणी बँक्वेट हॉलमध्ये डान्स स्टेजमध्ये प्रवेश करतात. यानंतर सर्वजण नाचू लागतात. हा व्हीडिओ theweddingbrigade नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.