पैज! इतके विचित्र कपडे पाहिलेच नसतील, मॉडेल्सचा रॅम्पवॉक
आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मॉडेल्स विचित्र कपडे घालून रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. हे ड्रेस पाहून तुम्ही थक्क व्हाल.
तुम्ही अनेक मॉडेल्सना रॅम्पवॉक करताना पाहिलं असेल. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तिच्या सौंदर्यात भर घालतात. तुमच्या लक्षात आले असेल की कधीकधी मॉडेल्स खूप विचित्र असे कपडे घालून येतात. कधी फुले आणि पानांचे कपडे घालतात, तर कधी कचऱ्यापासून बनवलेले कपडे. नुकताच मिस थायलंड 2022 एना सुएंगम (Anna Sueangam) मिस युनिव्हर्स 2023 इव्हेंट दरम्यान कचऱ्यापासून बनवलेला ड्रेस परिधान करून खळबळ उडवून दिली होती. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मॉडेल्स विचित्र कपडे घालून रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. हे ड्रेस पाहून तुम्ही थक्क व्हाल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मॉडेल एक विचित्र ड्रेस घालून येते, जो कट जॅकफ्रूटसारखा दिसतो. मात्र स्टेजवर येताच मॉडेल तिच्या विचित्र ड्रेसला सुंदर ड्रेसमध्ये रुपांतरित करते.
त्याचप्रमाणे आणखी एक मॉडेलही विचित्र ड्रेस परिधान करून स्टेजवर पोहोचते. तिचा ड्रेस फळांसारखा दिसतो. याशिवाय व्हिडिओमध्ये आणखी काही मॉडेल्स देखील दाखवण्यात आल्या आहेत, ज्यांचा ड्रेस एखाद्या फळ आणि भाजीसारखा दिसत होता.
असे विचित्र कपडे घालणे तर सोडाच, असे कपडे घालून घराबाहेर कोण पडणार असा प्रश्न तुम्हाला व्हिडीओ पाहताना पडेल.
damn!!! pic.twitter.com/UEtBwJCSVJ
— Funnyman (@fun4laugh) January 10, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ @fun4laugh नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 48 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 83 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाइकही केला आहे.
त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी ‘मी पाहिलेल्या विचित्र गोष्टींपैकी ही एक आहे’, असं म्हणतंय, तर कुणी पहिला ड्रेस एकदम ‘किलर’ होता असं म्हणतंय. त्याचप्रमाणे इतर काही युजर्सनीही त्या ड्रेसेसना विचित्र म्हटलं आहे, तर काहींनी ते भन्नाट असल्याचंही म्हटलं आहे.