जगात राहण्यासाठी टॉप टेन चांगली शहरं कोणती ? भावा..आपली मुंबई आहे का पाहा
या खाजगी संशोधन संस्थेने यादी जाहीर करताना म्हटले आहे की, आशियाई, आफ्रिकन आणि मध्य पूर्व देशांमध्ये आरोग्य आणि शिक्षण आदी सेवांमुळे ग्लोबल निर्देशांकात वाढ झाली खरी, परंतू काही भागातील अशांत वातावरणामुळे स्थिरतेला धक्का बसला आहे.
मुंबई : कोणत्याही शहराला त्याचा भूगोल असतो तसा इतिहास देखील असतो. असं म्हणतात की भूगोल तर सर्वच शहरांना असतो, परंतू इतिहास मोजक्याच शहरांना असतो. कोणत्याही शहरात वास्तव्य करायचे असेल तर आपण तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्त्यांचे जाळे, आणि हॉटेलिंगचा खर्च एकंदर रहाणीमान पाहत असतो. इकॉनॉमिस्ट इंटेलिजंस युनिटने ( The Economist Intelligence Unit ) अलिकडेच ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स 2023 ( Global livability index 2023 ) जाहीर केला आहे, त्यानूसार जगातील टॉप टेन राहण्या योग्य शहरांची यादीच जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या शहरांना त्यात सामील होण्याचं भाग्य लाभलंय पाहूया…
एखाद्या देशाची प्रगती तेथील रस्त्यांच्या दर्जावरुन ठरविली जाते असे म्हणतात. तसं पहायला गेले तर अमेरिकेतील रस्त्यांचा दर्जा उत्तम मानला जातो, अमेरिका प्रगत देश आहे म्हणून तेथील रस्ते चांगले आहेत असे नव्हे तर तेथील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिकेने प्रगती केली आहे असे म्हटले जाते. इकॉनॉमिस्ट इंटेलिजंस युनिटने अलिकडेच ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स 2023 जाहीर केला आहे, त्यात ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्ना शहराने या यादीत पहिलं स्थान पटकावले आहे.
अशांततेमुळे स्थिरतेच्या गुणांत घट
या खाजगी संशोधन संस्थेने यादी जाहीर करताना म्हटले आहे की, आशियाई, आफ्रिकन आणि मध्य पूर्व देशांमध्ये वाढत असलेल्या आरोग्यसेवा आणि शिक्षणावर आदी सेवांमुळे ग्लोबल निर्देशांक 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, सर्वेक्षणातील या ताज्या निष्कर्षांनी आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. परंतू. तरीही जगात काही भागातील युद्धजन्य परिस्थिती, यादवी आणि दंगलींनी झालेल्या अशांततेमुळे स्थिरतेच्या गुणांमध्ये घट झाली आहे.
म्हणून व्हीएन्नाचा क्रमांक पहिला
स्थैर्य, संस्कृती, मनोरंजन तसेच पायाभूत सुविधा आणि इतरांना प्रेरणादायी अशी शिक्षणाची व्यवस्था आणि आरोग्य सेवा या घटकांच्या एकत्रित संयोगामुळे व्हिएन्ना शहरातील राहणीमानाच्या या यादीत अव्वल स्थान टिकवून ठेवल्याचे इकॉनॉमिस्ट इंटेलिजंस युनिटने म्हटले आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनने रहाणीमानाच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे, तर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि सिडनी या दोन शहरांनी 2023 च्या क्रमवारीत तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला आहे.
ही पहा टॉप टेन रहाण्यासाठी योग्य शहरं
१ ) व्हीएन्ना, ऑस्ट्रीया
२) कोपनहेगन, डेन्मार्क
३) मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
४) सिडनी, ऑस्ट्रेलिया
५) व्हॅनकुवर, कॅनडा
६) झुरीच, स्वित्झर्लंड
७) कॅलकरी, कॅनडा
८) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
९) टोरोंटो, कॅनडा
१०) ओसाका, जपान आणि ऑकलॅंड, न्यूझीलॅंड