गुगलवर सर्च केले तीन शब्द, मग जीवनात मोठा गोंधळ, यूजरने सांगितला ऑनलाइन Ads चा शॉकींग फॅक्ट
गूगलवर एका यूजरने हेलिकॉप्टरची किंमत किती असते? असे सर्च केले. त्यानंतर त्याच्या जीवनात मोठा बदल झाला. त्याला YouTube, फेसबुक, इस्टाग्राम किंवा इतर काहीही सुरु केले तरी त्याला वेगळ्या जाहिराती दिसू लागल्या.

गूगलवर प्रत्येक गोष्टींची माहिती मिळत असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) येण्यापूर्वी गूगलवर प्रत्येक माहिती विचारली जात होती. गूगलवर एखादी गोष्ट सर्च केल्यावर काय होते? त्याचा अनुभव एका यूजरने मांडला. गूगलच्या एल्गोरिदमबाबतचा हा अनुभव आहे. व्यक्ती जे सर्च करतो, त्यासंदर्भातील जाहिरातीचा मारा त्याच्याकडे सुरु होतो. एका यूजरने X वर याबाबत आपले अनुभव शेअर केले. मग त्या जाहिरातींपासून सुटका करुन घेण्यासाठी काय केले? त्याची माहिती त्याने दिली.
गूगलवर एका यूजरने हेलिकॉप्टरची किंमत किती? असे सर्च केले. त्यानंतर त्याच्या जीवनात मोठा बदल झाला. त्याला YouTube, फेसबुक, इस्टाग्राम किंवा इतर काहीही सुरु केले तरी त्याला वेगळ्या जाहिराती दिसू लागल्या. त्या जाहिराती कोणत्या प्रकारच्या होत्या त्याची यादीच यूजरने दिली आहे. X वर @mgnayak5 नावाच्या यूजरने याबाबत एक पोस्ट शेअर केली.




- बुर्ज खलीफामध्ये आपल्या सुट्या साजरा करा.
- आपल्या आप्तेष्टांना हिऱ्याचे दागिने भेट द्या.
- इजिप्तचे पिरामिड तुमची वाट पाहत आहे.
- ग्रीसचे आकर्षण तुम्हाला आकर्षित करत आहे.
- iPhone 16 ची प्री-बुकींग करा.
- कॅनडामध्ये आपल्या स्वप्नातील घर घ्या.
यूजरने पुढे लिहिले या पद्धतीच्या जाहिरातींच्या माऱ्यातून बाहेर येण्याचा उपाय मी शोधू लागलो. त्यानंतर मला एक उपाय सापडला. मी गूगलवर पुन्हा एक सर्च केले. त्यात ‘फाटलेले बुट दुरुस्त कसे करावे?’ त्याबाबत सर्च केले. त्यानंतर पुन्हा जाहिराती माझ्या सामान्य पातळीवर आल्या. Facebook, YouTube आणि Instagram वर मला जाहिराती दिसू लागल्या. ‘फक्त 300 रुपयांमध्ये एक जोडी बूट विकत घ्या. आज ऑफर फक्त ₹210 मध्ये 2 जोडी सँडल… यूजरच्या या पोस्टला अनेक लाईक मिळाल्या आहेत.
🥴🥱😄😂*A few days ago, out of curiosity, I searched on Google for “How much does a helicopter cost?” Since then, my life has been in chaos. No matter where I go whether it's YouTube, Face Book, Instagram, I’m bombarded* *with luxury advertisements like:*
🥴 *“Spend your…
— MG 🇮🇳 (@mgnayak5) January 20, 2025
इंटरनेटचे हे जग व्यक्तीच्या आयुष्यावर किती प्रभाव टाकत आहे, हे त्या युजरच्या पोस्टमधून समोर येत आहे. आपली गरज आणि आपली परिस्थिती पाहून जाहिरातींचा मारा गूगलचे एल्गोरिदम प्रत्येक व्यक्तीवर करत आहे. अनेकांना या पद्धतीचे अनुभव आलेले आहेत.