रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवरील वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ नेमका काय? वाचा सविस्तर

आपण बऱ्याचदा गावी किंवा कुठेतरी फिरायला जात असाताना रस्त्याच्या कडेला आपल्याला माहिती देणारे रंगेबिरंगी दगड ठिकठिकाणी बघायला मिळतात (Different Color Of Milestones On Indian Roads)

रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवरील वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ नेमका काय? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 11:24 PM

मुंबई : आपण बऱ्याचदा गावी किंवा कुठेतरी फिरायला जात असताना रस्त्याच्या कडेला आपल्याला माहिती देणारे रंगेबिरंगी दगड ठिकठिकाणी बघायला मिळतात. रस्त्याच्या अगदी कडेला विशिष्ट आकारच्या दगडावर कोणतं गाव किती किलोमीटरवर आहे, याची माहिती दिलेली असते. मात्र, या दगडांवर माहितीसोबत वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्याही आपल्याला बघायला मिळतात. या रंगेबिरेंगी पट्ट्यांचा नेमका अर्थ काय असेल? याचबाबत माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Different Color Of Milestones On Indian Roads).

नारंगी रंगाची पट्टी

अनेकदा आपण सस्त्याच्या कडेला असलेल्या माहिती देणाऱ्या फलकावर (दगडावर) नारंगी रंगाची पट्टी बघतो. या पट्टीचा अर्थ म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातील रस्त्यांवरुन चालत आहात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जवाहर रोजगार योजना आणि इतर योजनांअंतर्गत गावात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या माहितीसूचक दगडावर नारंगी रंगाची पट्टी लावण्यात आलेली असते. भारतात ग्रामीण रस्त्यांचं जाळ हे जवळपास 3.93 लाख किमी इतकं आहे.

पिवळी पट्टी

पिवळ्या पट्टीचा अर्थ असा की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहात. एका शहातून दूसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय महार्गावरुन प्रवास करत असाल तर तुम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या माहितीसूचकावर पिवळ्या रंगाची पट्टी दिसेल. भारतात राष्ट्रीय राजमार्गाचं जाळ जवळपास 1 लाख 51 हजार 19 किमी इतकं आहे.

निळ्या, काळ्या किंवा पाढऱ्या रंगाची पट्टी

तुम्ही जर रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशासूचकावर निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची पट्टी बघितली तर शहरी किंवा जिल्हांतर्गत रस्त्यावर आहात. भारतात या रस्त्याचे जाळे 5 लाख 61 हजार 940 किमी हजार इतकं आहे.

हिरवी पट्टी

राज्यांतर्गत शहराशहराला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला माहिती देणाऱ्या माहिती सूचकावर हिरव्या रंगाची पट्टी असते. 2016 च्या आकडेवारीनुसार देशात या रस्त्यांचे जाळे हे 1 लाख 76 हजार 166 किमी इतके आहे (Different Color Of Milestones On Indian Roads).

हेही वाचा : Maharashtra Corona Update : हाहा:कार ! राज्यात कोरोनाचे तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, मृतांचा आकडाही 400 पार

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.