Zomato ने केळ्याच्या चिप्सबद्दल असे काय लिहिले की भडकले युजर्स, नंतर कंपनीने असे सांगितले
झोमॅटोने बुधवारी त्यांच्या कार्यालयातील एका डेस्कवर ठेवलेल्या चिप्सच्या पाकिटाचा फोटो ट्वीट केल्याने खळबळ उडाली. त्यामुळे कंपनीने ही पोस्ट नंतर डिलिट करुन युजरची माफी मागितली आहे.
नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : आपल्याला हवे ते गरमागरम अन्नपदार्थ घरबसल्या होम डीलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो ( Zomato ) ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीच्या सोशल मिडीयावर एका पोस्टने युजर्सच्या नाराजीचा सामना कंपनीला करावा लागला आहे. ट्वीटर ( एक्स ) झोमॅटोने एक फोटो पोस्ट केल्याने खळबळ उडाली. कंपनीने या ट्वीटरवरील पोस्टवर पोलीसांनीही टॅग केल्याने आणखीनच युजर वैतागले. अखेर कंपनीने ही पोस्ट डीलिट करीत दिलगिरी व्यक्त केली आहे.
ऑनलाईन फूड डीलिव्हरी करणारी झोमॅटोच्या सोशल मिडीया टीमने त्याच्या कार्यालयातील एक फोटो ट्वीटरवर पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे. झोमॅटो कंपनीने बुधवारी त्यांच्या कार्यालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत केळ्याच्या चिप्सचे पॅकेट आणि कंप्युटर स्क्रीनवर बोल्ड आणि जंबो फॉण्टच्या आकारात HELPPP ! असं लिहीलेला फोटो शेअर केला आहे.
हीच ती पोस्ट –
Hey @inshorts
I am not a journalist.
May be your journalists need to do a better job. pic.twitter.com/wAGhZv6gvc
— Ravi Handa (@ravihanda) September 21, 2023
पोलीसांना टॅग करीत झोमॅटोने असे लिहीले
झोमॅटोने त्यांच्या ट्वीटमध्ये लिहीले की हॅलो @gurgaonpolice, कोणी तरी ऑफीसमध्ये ड्रग्स आणले आहे. म्हणजेच केळ्याचे चिप्स खूपच नशीले असतात असा दावा त्यांनी केला आहे. या पोस्टच्या स्क्रीनशॉट शेअर करीत रवी हांडा यांनी झोमॅटोवर टीका केली आहे. एका मोठ्या कंपनीने बेजबाबदारपणा दाखविला आहे. त्यानंतर सुमारे एक तासानंतर झोमॅटोने त्याच्याशी सहमती व्यक्त करीत त्यांना उत्तर दिले आहे.
झोमॅटोच्या कस्टमर सर्व्हीस अकाऊंटने नंतर खुलासा केला की हॅलो रवी, तुम्ही खरे सांगत आहात. आम्हाला हे पटले आहे. हे ट्वीट बेजबाबदार आणि अनावश्यक ट्वीट आहे. आम्ही त्यास हटविले आहे. आणि आम्ही याबद्दल माफी मागत आहोत. एका युजरने लिहीले की झोमॅटो तुम्ही तुमची सोशल मिडीया एजन्सी बर्खास्त करा. तसेच सोशल मिडीया हॅंडल कायमचे बंद करा. केवळ काही लाईक मिळण्यासाठी झोमॅटोने आपल्या कमाईतील पैसे खर्च करणे बंद करायला हवे, झोमॅटोचा बहिष्कार करा.