VIDEO : ‘मला माझ्या नवऱ्याकडे जाऊ द्या’, चिमुकलीचा बालहट्ट, ढसाढसा रडली!

लहाण मुलं काय हट्ट करतील, याचा काहीच नेम नाही (little girl crying funny viral video).

VIDEO : 'मला माझ्या नवऱ्याकडे जाऊ द्या', चिमुकलीचा बालहट्ट, ढसाढसा रडली!
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 6:40 PM

मुंबई : लहाण मुलं काय हट्ट करतील, याचा काहीच नेम नाही. कधी ते काहीही प्रश्न विचारुन आई-वडिलांना भंडावून सोडतील तर कधी हट्ट पूर्ण करण्यासाठी रडून स्वत:चे डोळे सुजवून घेतील. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत चिमुकली तिला पतीकडे जाऊद्या म्हणून हट्ट करत आहेत. या हट्टापायी ती ढसाढसा रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ बघाल तर तुम्हाला देखील हसू आवरणार नाही (Little girl crying funny viral video).

व्हिडीओत नेमकं काय आहे?

व्हिडीओतील भोळी चिमुकली आपल्या आई आणि आजीकडे पतीकडे जाऊद्या, असा हट्ट करतेय. तिची आई आणि आजी तिला पती म्हणजे नेमकं कोण? असा प्रश्न विचारतात. त्यावर ती मामा असं उत्तर देते. पण मामा तर मामीचा पती असतो. बाबा आईचे पती असतात, असं एक महिला तिला सांगतेय. यावर ती चिमुकली माझा पती कोण आहे? असं रडतरडत विचारत आहे. तिच्या या रडण्यावर आजूबाजूला बसलेल्या महिला हसायला लागतात. यावरुन ती चिमुकली पुन्हा आरडाओरड करत रडायला लागते.

माझा नवरा कुठे चालला गेला? मला त्याला भेटायचं आहे. मला त्याच्याजवळ जायचं आहे, असं ती रडत म्हणते. तिच्या या रडण्यावर एक महिला तिला समजवण्याचा प्रयत्न करते. “लहान मुलांचे पती नसतात. लहाण मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांचे पती होतात. लहाण मुलांचे तर भाऊ-बहीण असतात”, अशी महिला मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यानंतरही मुलगी रडताना दिसत आहे.

या व्हिडीओला ट्विटरवर Vijay Kumar नावाच्या एका यूजरने शेअर केलं आहे. ‘मुलं पण ना.. कोन समजवणार यांना…’, असं कॅप्शन यूजरने व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे (Little girl crying funny viral video).

हेही वाचा : गावच्या कारभाऱ्याला आस्मान दाखवलं, सरपंचकीचा गुलाल उधळला, तेव्हाच शांत बसला!

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.