कुठे मिळाला होता कोहिनूर हिरा? जाणून घ्या कोहिनूर हिऱ्याचा इतिहास
कोहिनूर हिऱ्याबद्दल माहित नाही अशी क्वचित एखादी व्यक्ती असेल. कोहिनूर हिरा जगभरात प्रसिद्ध आहे. हा हिरा सध्या इंग्लंडमध्ये आहे. कोहिनूर हा पारशी शब्द आहे ज्याचा अर्थ प्रकाशाचा पर्वत असा होतो. हा कोहिनूर हिरा कुठे मिळाला आणि तो इंग्लंडला कसा गेला ते जाणून घेऊ.
कोहिनूर हिऱ्याचे नाव घेताच अनेकांना एक खंत वाटते की हा अमूल्य हिरा भारतामध्ये होता तो आता इंग्लंडमध्ये आहे. कोहिनूर हिऱ्याचा स्वतःचा इतिहास आहे ज्याचा प्रवास खूप मोठा आहे. त्याची कहाणी केवळ इंग्रजांनी भारतातून इंग्लंडच्या राणीला मुकुट हस्तांतरित करण्यापूर्ती मर्याद नाही. कोहिनूर हिऱ्याचे अनेक मालक होते आणि त्यानंतर तो ब्रिटनमध्ये पोहोचला पण फार कमी लोकांना कोहिनूर हिऱ्याबद्दल पूर्ण माहिती आहे. कोहिनूर हिऱ्याच्या बाबतीत एक विशेष गोष्ट म्हणजे हा हिरा कधीही विकला गेला नाही किंवा विकत घेतला गेला नाही तर हा हिरा प्रत्येक वेळी कोणीतरी भेट म्हणून दिला आहे किंवा तो काही युद्धांमध्ये जिंकला आहे.
इतिहासातून आणि बातम्यांमधून कोहिनूर हिऱ्याबद्दल अनेकदा माहिती मिळाली आहे. पण त्याचा खरा मालक कोण होता याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जाणून घेऊया ऐतिहासिक हिऱ्या बद्दलच्या त्या गोष्टीच्या फार कमी लोकांना माहिती आहेत.
कोहिनूर हिरा पहिल्यांदा कुठे आणि कोणी शोधला?
कोहिनूर हिरा भारतातच सापडला. हा हिरा सुमारे 800 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील गोलकोंडा खाणीत सापडला होता. या दुर्मिळ हिऱ्याचे वजन 186 कॅरेट होते मात्र नंतर हा हिरा अनेक वेळा कोरला गेला आणि त्याचे वजन कमी झाले. असे असले तरी देखील आजही कोहिनूर हा जगातील सर्वात मोठा कटिंग केलेला हिरा मानला जातो. 13 फूट खोलवर सापडलेला कोहिनूर चा पहिला मालक काकतिया राजवंशातील होता. हा अनमोल हिरा त्यांची कुलदेवता भद्रकालीच्या डाव्या डोळ्यात त्याकाळी बसवण्यात आला होता.
किती लोकांकडे होता कोहिनूर हिरा?
चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने काकतीयांकडून हा हिरा लुटला होता. पानिपतच्या युद्धात मुगल शासक बाबरने आग्रा आणि दिल्लीचे किल्ले ताब्यात घेतले आणि हा हिराही आपल्या सोबत नेला. 1738 मध्ये इराणचा शासक नादिर शहा यांनी मुघलांचा पराभव करून या हिऱ्यावर हक्क सांगितला आणि अहमद शहाकडून तो हिरा हिसकावून घेतला आणि तो स्वतः सोबत नेला. नादिर शहाने मयूर सिंहासनही लुटले आणि त्यात हा हिरा जडवला. नादिर शहाच्या हत्ये नंतर त्याचा नातू शाहरुख मिर्झा याला हिरा वारसा म्हणून मिळाला आणि त्याने अफगाण शासक अहमदशहा दुर्राणी यांना कोहिनूर भेट म्हणून दिला. 1813 मध्ये महाराजा रणजीत सिंह यांनी शुजा शाह यांच्याकडून हिरा घेतला आणि तो भारतात परत आणला.
हिरा ब्रिटिशांकडे कसा गेला?
1849 मध्ये शिख आणि ब्रिटिश यांच्यात दुसरे युद्ध झाले. या युद्धात शिख साम्राज्याचा अंत झाला. ब्रिटिशांनी महाराजा गुलाबसिंग यांच्या सर्व मालमत्तेसह कोहिनूर हिरा ब्रिटन मधील राणी व्हिक्टोरियाला सुपूर्त केला. 1850 मध्ये हा हिरा बकिंगहॅम पलेसमध्ये आला आणि डच फर्म कोस्टर ने तो हिरा कोरून राणीच्या मुकुटामध्ये ठेवला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने ही कोहिनूर हिऱ्यावर दादा केला आहे. सध्या हा हिरा लंडनमध्ये असून तो भारतात परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.