कोणत्या रुपयांच्या नोटेवर, कुठले चित्र छापले आहे? माहित नसेल तर जाणून घ्या

वेगवेगळ्या नोटांवर वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंची चित्रे आहेत. पण ही चित्रे कुठली आहेत आणि याच्या कोणत्या नोटेवर कोणत्या इमारतीचे चित्र छापलेले आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हे जाणून घ्यायचे असेल तर नुकतेच एका ट्विटर युजरने याबाबत सांगितले आहे.

कोणत्या रुपयांच्या नोटेवर, कुठले चित्र छापले आहे? माहित नसेल तर जाणून घ्या
Indian rupees print
| Updated on: Apr 30, 2023 | 4:21 PM

मुंबई: भारतीय चलनातील नोटांवर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की वेगवेगळ्या नोटांवर वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंची चित्रे आहेत. पण ही चित्रे कुठली आहेत आणि याच्या कोणत्या नोटेवर कोणत्या इमारतीचे चित्र छापलेले आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हे जाणून घ्यायचे असेल तर नुकतेच एका ट्विटर युजरने याबाबत सांगितले आहे. देसी ठग नावाच्या ट्विटर हँडलवर एक थ्रेड पोस्ट करण्यात आली आहे. त्यात काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या छायाचित्रांमध्ये ऐतिहासिक वास्तूंची छायाचित्रे दाखवण्यात आली असून भारतीय चलनी नोटेवर कोणत्या इमारतीचे छायाचित्र छापले आहे, त्या नोटेचा फोटोही त्याच इमारतीसमोर दाखवण्यात आला आहे.

वेगवेगळ्या नोटांवर छापलेल्या एकाच चित्रात इमारत आणि नोटा दिसत असल्याचे दिसून येते. ही ट्विटर थ्रेड अप्रतिम आहे आणि अतिशय तपशीलवार लिहिली आहे. तुम्ही जर ही ट्विटर थ्रेड पाहिली तर तुम्हाला बरीच माहिती मिळेल.

उदाहरणार्थ 500 रुपयांच्या नोटेवर लाल किल्ल्याचे चित्र छापलेले असते, तर पोस्टवर लाल किल्ल्याचे चित्र दिसते आणि समोर 500 रुपयांची नोटही दाखवली गेलीये. अशाच प्रकारचे उदाहरण इतर नोट्सचेही देण्यात आले आहे. तुम्हीही ही थ्रेड वाचलीत तर तुमचीही माहिती वाढेल. या ट्विटचं ट्विटर युजर्स त्याचे भरभरून कौतुक करत आहेत.