कोणत्या धर्मातील लोक झपाट्याने स्वीकारत आहेत इस्लाम? आकड्यांनी हिंदू नेते हैराण
Report on Islam : पाश्चात्य अथवा भारता बाहेरील काही प्रमुख धर्माचे धर्मांतरण हे महत्त्वाचे अंग आहे. हिंदू धर्मात ही बाब ऐच्छिक मानण्यात येते. त्यासाठी मोहिम राबवण्यात येत नाही अथवा बंधन घालण्यात येत नाही. जगात ख्रिश्चन आणि मुस्लिम या दोन धर्माची संख्या सर्वाधिक आहे.

एका अमेरिकन थिंक टँक संस्थेने जगभरातील 36 देशात एक सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना एक वेगळं तथ्य समोर आले आहे. लहानपणापासून ते वयोवृद्ध होईपर्यंत काहींचा धर्म इस्लाम आहे. तर या देशातील काही लोकांचा लहानपणीचा धर्म वेगळा आणि आता वय झाल्यावर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे समोर आले आहे. अर्थात ही संख्या फार नाही. पण उतार वयात इस्लाम स्वीकारल्याचे त्यातून समोर आले आहे. तर काही वृद्ध असे पण आढळले की ते जन्मतः मुस्लिम होते, पण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी या धर्माचे पालन करणे बंद केले आहे.
या सर्वेक्षणात एकूण 36 देशांपैकी 13 देशांमध्येच योग्य नमुने गोळा करता आले. यामध्ये इस्लाम स्वीकारणारे आणि इस्लाम सोडणारे अशा दोघांचाही तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यांची सविस्तर माहिती नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या देशात आर्थिक प्रगत राष्ट्रांसह आफ्रिकन आणि इतर खंडातील देशांचा समावेश होता. त्यात अमेरिका या देशातही सर्वेक्षण करण्यात आले.
इस्लाम सोडून झाले ख्रिश्चन




ज्या 13 देशांमध्ये या संस्थेला नमुने गोळा करता आले. त्याठिकाणी इस्लाम सोडणाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला. हे लोक इस्लाम सोडवल्यावर इतर कोणताच धर्म स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. ते नास्तिक झाले आहे अथवा त्यांना कोणताच धर्म स्वीकारायचा नसल्याचे त्यांनी सांगितले. तर काही जणांनी इस्लाम सोडल्यावर ख्रिश्चन धर्म जवळ केल्याचे समोर आले आहे.
या देशात इस्लाम वाढला
अमेरिका आणि केनिया या देशात इस्लाम स्वीकारण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. या दोन्ही देशात इस्लाम मानणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील 20% आणि केनियातील 11% लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे. इस्लाम स्वीकारणारे या दोन्ही देशातील लोक हे अगोदर ख्रिश्चन होते. यामध्ये उतारवयातील लोकांची संख्या अधिक आहे. या दोन्ही देशात मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत. या सर्वेक्षणात भारताचा समावेश होता की नाही, याची माहिती समोर आली नाही.