लहान बहिणीला गणित शिकवता शिकवता यालाच रडू आलं! व्हिडीओ व्हायरल
मोठा भाऊ बहीण, गणित शिकवत असले तरी काही लहान भावंडं अशी असतात की ज्यांना अजिबातच यातलं काही लक्षात येत नाही.
प्रत्येकालाच गणित पटकन समजतं असं नाही. गणित शिकवण्यासाठी शिक्षकालाही खूप धीर धरावा लागतो. कारण कधी-कधी असे विद्यार्थी असतात ज्यांना कितीही वेळा शिकवा त्यांना ते पटकन समजत नाह. मग त्यांना पुन्हा पुन्हा सांगावे लागते. मात्र, एखाद्या घरात मोठे मूल असेल तर त्याच्या लहान भावंडांना शिकवण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. मोठा भाऊ बहीण, गणित शिकवत असले तरी काही लहान भावंडं अशी असतात की ज्यांना अजिबातच यातलं काही लक्षात येत नाही. मग मोठ्याला गणित शिकवता शिकवता निराशा येणं स्वाभाविक असते.
एक चिनी मुलगा आपल्या बहिणीला गणित शिकवताना इतका निराश झाला की, बहिणीला समजत नसल्याने तो लहान मुलासारखा रडू लागला.
चीनच्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा रडताना दिसत आहे, कारण त्याच्या बहिणीला गणित समजत नाहीये. व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला होता, कॅप्शनसह – ‘व्हेरी दुखी.’ हा व्हिडिओ ‘मस्ट शेअर न्यूज’ ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
व्हिडिओ सुरू होताच एक मुलगा आपल्या लहान बहिणीला गणित शिकवताना रडताना दिसत आहे. त्याची आई व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि ती बॅकग्राउंडमध्ये म्हणते की, तो लवकरच निराश होतो म्हणून तो शिक्षक होऊ शकत नाही.
तिचा मोठा मुलगा रडतो तेव्हा ती म्हणते, ‘तू शिक्षक होऊ शकत नाहीस.’ त्यानंतर तो मुलगा रडतो आणि उत्तर देतो, “मी तिला आधीच उत्तर दिलं आहे. चित्रात तीन काटकोन आहेत, पण ती म्हणते की दोन आहेत.”
View this post on Instagram
आईला आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. गणित शिकताना ती लहान मुलगी रडतानाही दिसते. संपूर्ण कुटुंब डायनिंग टेबलवर गणित शिकवण्यासाठी बसलेलं आपल्याला या व्हिडिओत दिसतं.