Elephant video viral : जंगलातल्या रस्त्यानं जात असताना अचानक समोर आला महाकाय हत्ती आणि…

Animal video : सहसा हत्ती (Elephant) जंगलातच दिसतात. मात्र सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीसोबत रस्त्याने चालला आहे, पण तेवढ्यात त्यांच्यासमोर एक हत्ती दिसला.

Elephant video viral : जंगलातल्या रस्त्यानं जात असताना अचानक समोर आला महाकाय हत्ती आणि...
अचानक समोर हत्ती आल्यानंतर दुचाकीचालकांची झालेली पळापळ
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:57 PM

Animal video : सहसा हत्ती (Elephant) जंगलातच दिसतात किंवा जेव्हा लोक सर्कस पाहायला जातात तेव्हा ते तिथे दिसतात. महाकाय हत्तीला पाहुन लोक त्याच्यापासून अंतरच ठेवतात. कारण त्यांना केव्हा राग येईल, याबद्दल कोणीही सांगू शकत नाहीत. मात्र, भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जंगलांच्या मधोमध रस्ते बांधण्यात आले आहेत आणि अनेक वन्य प्राणीही तेथून जातात. अशा स्थितीत तिथून कोणी जात असेल तर काळजी घ्यावी लागते. असाच काहीसा प्रकार इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसला, जेव्हा एक दुचाकीस्वार त्याच्या एका साथीदारासह रस्त्यावरून जात होता. सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीसोबत रस्त्याने चालला आहे, पण तेवढ्यात त्याला त्याच्यासमोर एक हत्ती दिसला.

अचानक समोर आला हत्ती

गाडीवरून जाताना अचानक समोरून हत्ती आला. हत्ती आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि कधीही आपल्या दिशेने येऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटत होती. काही सेकंदानंतर चिडलेला हत्ती दुचाकीस्वाराच्या दिशेने धावू लागला. दुचाकीस्वार आपली कार तिथेच सोडून पळू लागला. त्याचा साथीदारही त्याच्यासोबत धावू लागला. हत्ती त्यांचा पाठलाग करतो तसे ते वेगात धावायला लागतात.

ट्विटरवर शेअर

सुदैवाने काही अंतरापर्यंत पळून गेल्यानंतर हत्ती थांबला. दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराच्या जीवात जीव आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. @FredSchultz35 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 9 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 16हून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ 2 लाख 75 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

आणखी वाचा :

Anand Mahindra tweet : बैलांच्या कळपावर ‘हा’ एकटा बदक भारी! पाहा, Ultra high josh..!

‘अतिशहाणा त्याचा…’ ‘हे’ महाशय असं काही करायला गेले अन् धपकन् आपटले, Viral video पाहा

‘या’ माणसाला पाहुन का पळताहेत लोक? Viral Prank videoवर यूझर्सही संतापले, असं आहे तरी काय यात?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.