कोंबडी आधी की अंडं? अखेर उत्तर मिळालं, शास्त्रज्ञ म्हणतात…
तासन् तास वाद घातल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना उत्तर मिळत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की जगात पहिलं कोण आलं.
जगात प्रथम कोण आलं, कोंबडी की अंडं हा प्रश्न तुम्ही लहानपणापासून ऐकत आहात का? कोंबडी की अंडं, अंडं की कोंबडी, कोंबडी, अंडं, कोंबडी … याबद्दल तुम्ही वारंवार विचार करत असाल ना? पण यावर कुठलं उत्तर नाही आणि असलं तरी त्याला पुरावा नाही. तासन् तास वाद घातल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना उत्तर मिळत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की जगात पहिलं कोण आलं.
या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञांना सापडलं आहे. डेली एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील शेफिल्ड आणि वॉरविक विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी अंडी आणि कुक्कुटपालनाच्या या प्रश्नावर मोठ्या सखोलपणे संशोधन केले.
या अभ्यासानुसार जगात अंडी नव्हे तर कोंबडी प्रथम आली. होय.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसं बुआ? तर यावर संशोधन सांगतं… काय सांगतं बघुयात!
शास्त्रज्ञांच्या मते कोंबड्याच्या अंड्याच्या कवचात ओव्होक्लिडाइन नावाचे प्रथिने आढळतात. या प्रथिनाशिवाय अंडी तयार करणे शक्य नाही. इतकंच नाही तर कोंबडीच्या गर्भाशयातच हे प्रोटीन तयार होतं, या अर्थानं कोंबडी जगात पहिली आल्याचंही सांगण्यात आलं आहे.
तिच्या गर्भाशयात ओव्होक्लिडाइन तयार झाले असावे आणि नंतर हे प्रथिने अंड्याच्या कवचापर्यंत पोहोचले असावे. शास्त्रज्ञांच्या या अभ्यास आणि संशोधनातून असे दिसून आले की अंड्यांपूर्वी कोंबडी जगात आली होती.
सध्या कोंबडी जगात कशी पोहोचली, असा आणखी एक प्रश्न लोकांना सतावत आहे. हा प्रश्न अजूनही न सुटलेलं कोडं आहे.