कोण आहे हा सिविल इंजीनियर सिद्धार्थ? ज्याच्या पोस्टवरुन सोशल मीडियावर इतकी खळबळ

गोव्यात राहणारा एका सिविल इंजीनियर आणि इन्वेस्टर सिद्धार्थ सिंह गौतमच्या एका पोस्टवरुन इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे. काही लोक त्याच्याशी सहमत आहेत, काही त्याच्या विरोधात आहेत. त्याने X वरच्या पोस्टमध्ये असं काय म्हटलय, ज्यावरुन इतका गदारोळ सुरु आहे.

कोण आहे हा सिविल इंजीनियर सिद्धार्थ? ज्याच्या पोस्टवरुन सोशल मीडियावर इतकी खळबळ
Social Media PostImage Credit source: X/@Sidcap_100
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 1:57 PM

गोव्यात राहणाऱ्या एका सिविल इंजीनियर आणि इन्वेस्टरच्या टि्वटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये सिद्धार्थ सिंह गौतम नावाच्या एका व्यक्तीने म्हटलय की, तो 2025 मध्ये कायमचा भारत देश सोडून निघून जाणार आहे. इतकच नाही, सिद्धार्थने अन्य लोकांना सुद्धा आवाहन केलय की, शक्य झाल्यास तुम्ही सुद्धा लवकरात लवकर भारत सोडण्याचा प्रयत्न करा. सिद्धार्थच्या टि्वटने सोशल मीडियावर एका नव्या वादाला जन्म दिलाय. त्यांच्या या टि्वटवर अनेकांनी सहमती आणि अनेकांनी असहमती प्रगट केलीय.

राजकीय अव्यवस्था, उच्च टॅक्स दर आणि सतत बिघडत जाणारी हवेची गुणवत्ता याने निराश होऊन X च्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केलेत. “मी 2025 साली भारत सोडून कायमसाठी सिंगापूरला शिफ्ट होणार आहे. डॉक्युमेंट प्रोसेसमध्ये आहेत. आता मी इथल्या राजकीय नेत्यांना सहन करु शकत नाही. त्याने उच्च कराच्या बोझ्यावर टीका केली. मी 40 टक्के टॅक्स भरु शकत नाही. प्रदूषित हवेत श्वास घेऊ शकत नाही. कुठल्याही गोष्टीसाठी कोणाचीही जबाबदार नाही” असं त्याने त्याच्या X पोस्टमध्ये म्हटलय.

कमी पगारांच्या लोकांसाठी कुठले चांगले देश?

सिद्धार्थने आपल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये लोकांना सल्ला दिलाय की, “ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे, त्यांनी लवकरात लवकर भारत सोडण्याची तयारी करावी. कारण सिंगापूर सारख्या देशात ते भारतपेक्षा चांगलं आयुष्य जगता येईल” कमी इनकम ग्रुपच्या लोकांसाठी त्याने सल्ला दिलाय की, “ज्यांचा महिन्याचा पगार 50 हजार रुपये आहे, त्यांच्यासाठी बाली आणि थायलंड बेस्ट ऑप्शन आहेत”

सिद्धार्थच्या पोस्टवर लोकांच म्हणणं काय?

सिद्धार्थच्या या पोस्टवरुन इंटरनेटवर वाद सुरु झालाय. काही लोक त्याच्याशी सहमत आहेत. काही लोकांच्या मते, परदेशात जाऊन चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा बाळगणं स्वाभाविक आहे. पण सिद्धार्थ सारख्या लोकांचे विचार म्हणजे देशाच्या समस्यांपासून पळण्यासारखं आहे.

‘…तर तुम्ही त्यांना सोडून पळून जाल का?’

देश सोडून पळण्यापेक्षा चांगल्या सुधारणेसाठी पुढे का येत नाही? असं एका युजरने विचारलं. त्यावर सिद्धार्थने उत्तर दिलं की, “मी भरपूर टॅक्सही भरायचा आणि विकासही मिळणार नाही. हे कितपत योग्य आहे? प्रत्येक जण भ्रष्टाचाराने पैसा बनवतोय. मला जे म्हणायचय ते तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो” दुसऱ्या एका युजरने संतप्त प्रतिक्रिया दिली. “तू तुझ्या हँडलवरुन देशाचा झेंडा काढ. यामुळे दुटप्पीपणा कमी होईल” यावर सिद्धार्थने उत्तर दिलं की, “मला देशाच्या राष्ट्र ध्वजाशी नाही, देशाचे नेते आणि पर्यावरणापासून प्रॉब्लेम आहे” एका युजरने त्याला विचारलं, कुटुंब संकटात असेल, अडचणी असतील, तर तुम्ही त्यांना सोडून पळून जाल का?

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.