कुत्र्याच्या चुकीमुळे संपूर्ण घर जळून खाक!
संध्याकाळी घरी परतली तेव्हा तिला तिचं घर धुरानं भरलेलं दिसलं
छोट्याशा चुकीमुळे आपण कसे कंगाल कसा होऊ शकतो, याचा अंदाज या बातमीवरून येतो. पाळीव कुत्र्याच्या चुकीमुळे मालकाचं घर जळून राख झालंय. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला का? दोन दिवसांपूर्वी म्हणजे 24 डिसेंबर रोजी एका पाळीव कुत्र्याने चुकून हेअर ड्रायर लावला. या कुत्र्यामुळे ब्रिटनमधील एका घराला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या घरात धूरच धूर झाला, अग्निशमन दलाला कळवल्यानंतर इथे येऊन आग विझविण्यात आली.
शनिवारी संध्याकाळी घराच्या मालकाला घरात धूर दिसल्यानंतर एसेक्स फायर सर्व्हिसला बोलावण्यात आलं. एसेक्स फायर सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी एक महिला घरी परतली तेव्हा तिला तिचं घर धुरानं भरलेलं दिसलं आणि तिचा कुत्रा समोरच्या दरवाज्याबाहेर बसलेला दिसला.
अग्निशमन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की पाळीव कुत्रा पलंगावर उड्या मारू लागला आणि त्याने अनावधानाने त्या महिलेने पलंगाच्या वरच्या बाजूला असलेले हेअर ड्रायर चालू केले.
यानंतर त्याच्या पलंगाला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बेडरूममधील आग पाहिली आणि ती विझवण्यासाठी ते तिथे आले.
A freak accident caused a fire in Hockley today. A dog jumped on a bed and turned a hairdryer on, eventually causing it to catch alight to the mattress.
Once you’ve finished with any electrical appliances please unplug them.
Incident details ➡️ https://t.co/BSDEjBN9pO pic.twitter.com/nmoSyAL3si
— Essex Fire Service (@ECFRS) December 24, 2022
व्यवस्थापक गॅरी शिन यांनी ब्रिटीशांना अशा चुका करू नयेत किंवा त्यांना मोठे नुकसान होऊ शकेल अशा गॅझेटचा वापर करू नये असे आवाहन केले. “एकदा आपण हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर सारख्या कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर केला की, कृपया त्यांना अनप्लग करा आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा. घरातल्या मालकिणीने क्षणभरही विचार केला नसेल की तिचा कुत्रा हेअर ड्रायर चालू करेल, पण काहीतरी उकळण्यामुळे तुम्हाला नक्कीच मनःशांती मिळते.”