Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर एकसारखी का दिसतात जोडपी? सांगा…सांगा…ही कारणे वाचून बसेल धक्का

Couples Looking Alike : तुम्ही लक्षात घेतले असेल तर पती-पत्नी लग्नाच्या काही वर्षानंतर एकसारखी दिसतात. त्यांच्या चेहर्‍यांची ठेवण सारखी दिसते. त्यातील काहीतर जणू जुळे भाऊ-बहिणीसारखे दिसतात. पण असे होते का? काय आहे त्यामागील कारण?

लग्नानंतर एकसारखी का दिसतात जोडपी? सांगा...सांगा...ही कारणे वाचून बसेल धक्का
एकसारखी भासती नेहमी चेहरेImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 06, 2025 | 4:36 PM

तुम्ही अनेक जोडप्यांच्या चेहर्‍यात एक सारखेपणा पाहिला असेल. या जोडप्यांच्या चेहरेपट्टीत कमालीचा एकसारखेपणा (Couples Looking Alike) पाहून तुम्हाला ही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कधी कधी तर जणू ती जुळी बहिण-भाऊ असल्याचा भास पण होतो. त्यांचे डोळे, हनुवटी, भालप्रदेश, नाक, ओठ, दात, चेहऱ्याची ठेवण सुद्धा मिळती जुळती दिसते. काहींचे हसणे, हावभाव इतके सारखे असतात की पतीशी बोलावे नि पत्नीकडे पाहावे, शरीर बदल तेवढा जाणवतो. इतके दोघांमध्ये साधर्म्य (Couples Start Looking Similar) जाणवते.

दोन व्यक्ती 20-22 वा त्याहून अधिक काळ कधी भेटलेल्या नसतात. कधी बोललेल्या नसतात. लग्नानंतर हे दोन जीव एकत्र येतात. संसाराचे सूत्रधार होतात. मग त्यांच्यात इतके साधर्म्य का येते हा प्रश्न अनेकांना पडतो. तर यामागे एक विज्ञान दडलेले आहे, हे एकूण तुम्हाला पण विश्वास बसणार नाही.

लग्न हे दोन जीवाचं मिलन असतं हे उगाच म्हणत नाही. या दोन जीवातून एक जीव तयार होतो. मुलं जन्माला येतात. पुढील पिढी तयार होते. ही दोन माणसं शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या एकत्र येतात. त्यांच्यात चांगलं बॉडिंग असेल तर त्यांच्या चेहऱ्यापासून वागण्या बोलण्यात लकबीत अनेक साम्य दिसायला लागतात. त्यामागे काही मानसिक आणि सामाजिक घटकांचा प्रभाव जाणवतो.

हे सुद्धा वाचा

मानसिक कारणं काय काय?

भावनिक संबंध – जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात. एका छताखाली नांदतात. त्यांच्यात भावनिक नातं तयार होतं. दोन व्यक्ती सतत एकमेकांच्या संपर्कात आल्यावर, सुख-दुःखात एकमेकांना आधार देत असल्यावर त्यांच्या चेहऱ्यात साम्य आढळते.

कॉपी कॅट – अनेकदा पती-पत्नीचा एकमेकांवर काही बाबतीत प्रभाव दिसून येतो. काही गोष्टी, काही हरकती, स्वभावातील काही घटकांचा दोघांवर पण मोठा प्रभाव दिसतो. दोघेही कॉपी कॅट होतात. एकमेकांची लकब आपोआप आत्मसात करतात. नक्कल करतात.

समान धागा जोडतो – मन धागा धागा जोडते नवा असे एक गीत आहे. ते याठिकाणी चपखल बसते बघा. तर हा समान धागा शोधण्याचा दोघे पण प्रयत्न करतात. सारखे गुण, सारखा स्वभाव, व्यंजन, पोषाख, रंग अशा अनेक प्रकारात हा समान धाग जोडल्या जातो. त्यामुळे चेहरापट्टी, लकबी एकसारख्या दिसतात.

सामाजिक कारण तरी काय?

या दोघांचा संसाराचा गाडा एकाच छताखाली सुरू असतो. दोघांची जीवनशैली एकाच छताखाली खुलते. दोघे पण एकाच वातावरणात राहतात. वाद असले, काही गोष्टी पटत नसल्या तरी त्यातूनच प्रेम सुद्धा वाढते. शरीरात आपोआप बदल होतो.

आपल्याकडे 36 गुण जुळण्याचे शास्त्र खोलात जाऊन पाहिले तर हे गुण स्वभावानुसार, सांपत्तिक स्थिती, सुसंस्कृतपणा याला महत्त्व असल्याचे दिसते. त्यावरून दोन व्यक्तीला विपरीत परिस्थिती एकत्र नांदण्यास अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न होता. इतर ही अनेक घटकांमुळे, सुख-दुःखात एकमेकांसोबत असल्याने नवरा बायकोच्या चेहरापट्टीत, स्वभावात साम्य आढळते.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.