टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात का पडल्या उच्चशिक्षित जुळ्या बहिणी, एका लग्नाच्या आधीची गोष्ट
रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींसोबत विवाह करणाऱ्या अतुलच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. पण लग्नाच्या आधीची गोष्ट काय? जाणून घ्या,
मुंबई : देशात सध्या एका लग्नाची चांगलीच चर्चा आहे. चर्चा होण्यासाठी कारण ही तसंच आहे.जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीला आपला पती म्हणून निवडलं आहे. या दोघीही एकचा व्यक्तीच्या प्रेमात पडल्या आणि त्याच्या सोबत लग्न ही केलं. दोन्ही बहिणी उच्चशिक्षित आणि चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. पण तरी त्यांनी एक टॅक्सी चालकासोबत लग्नाचा निर्णय घेतल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
एकाच मंडपात एकाच व्यक्तीसोबत दोन्ही बहिणींनी लग्न केलं. पण असं केल्याने वराच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण कायद्यानुसार एक पत्नी हयात असताना दुसऱ्या महिलेसोबत विवाह करणं गुन्हा आहे.त्यामुळे वरावर गुन्हा दाखल झाला होता. आता त्याच्या अडणची आणखी वाढल्या आहेत. कारण त्याला महिला आयोगाने नोटीस बजावली आहे.राज्य महिला आयोगाने सोलापूर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
महिला आयोगाची नोटीस
महाराष्ट्र राज्य महिला आयोग (MSCW)च्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याबाबत सोलापूर पोलिसांसोबत (Solapur Police) चर्चा केली. आयपीसीच्या कलम 494 नुसार त्यांच्यावर कारवाई सुरु करण्याची सूचना त्यांनी केली.
मुंबईत राहणारा अतुल अवताडे (Atul Avtade) याने रिंकी आणि पिंकी पडगावकर यांच्यासोबत विवाह केला. दोन्ही बहिणींच वय 36 वर्ष आहे. दोघीही इंजिनिअर आहेत आणि एका आयटी कंपनीत काम करतात. हा विवाह 2 डिसेंबर रोजी पार पडला. या विवाह सोहळ्याला ३०० लोकांनी हजेरी लावली. त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग वर अडचणीत आला.
अतुलच्या प्रेमात कशा पडल्या जुळ्या बहिणी?
दोन्ही जुळ्या बहिणींच्या घरी कोणताही कर्ता पुरुष नाहीये. जेव्हा त्यांची आईची प्रकृती बिघडली तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या अतुलने त्यांना खूप मदत केली होती. अतुलचा हा स्वभाव पाहून या दोन्ही बहिणी त्याच्या प्रेमात पडल्या. एकत्र वाढलेल्या, एकत्र शिक्षण घेतलेल्या या दोन्ही बहिणींनी पुढे ही एकत्रच संसार करण्याचा निर्णय घेतला.