बिअरच्या बाटलीचा वरचा भाग इतका पातळ का असतो? ते पाईपसारखं बनवण्याचं कारण तुम्हाला माहित आहे का ?
गर्मीच्या दिवसात जगात बिअरची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यातून महसूल सुध्दा भारतात अधिक जमा होतो. महाराष्ट्रात मागच्या तीन महिन्यात बिअरची अधिक विक्री झाली आहे.

मुंबई : तुम्ही बियरच्या बॉटल (beer bottle) पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सारखी दिसते. सगळ्या बियरच्या कंपनीच्या बॉटल तु्म्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, बिअरच्या बॉटलवरच्या बाजूला लहान आकाराच्या का असतात ? तशी तुम्हाला दुसऱ्या आकाराची बिअर सुध्दा दिसू शकते, परंतु बिअर लॉन्ग नेक (LONG NECK) बॉटलमध्ये मिळते. ती बॉटल खालच्या बाजूने जाड असते. त्याचबरोबर बॉटलचा आकार मोठा असतो. त्यामुळे ती बॉटलला वरच्या बाजूने एक नळी (Pipe) असते.
लॉन्गनेक बॉटल असं दुसरं नावं सुद्धा…
अमेरिकेतील छोट्या आकाराच्या बॉटल असतात त्यांना अमेरिकेमध्ये लॉन्गनेक आकार असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ती इंडस्ट्रीमधील सगळ्यात उच्च दर्जाची बॉटल मानली जाते. सध्या त्याचं आकाराच्या बॉटल जास्त आहेत. त्याला लॉन्गनेक बॉटल असं दुसरं नावं सुद्धा आहे.
ती पकडायला एकदम सोप्पी पडते
आकाराच्या पाठीमागे काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं. एकतर जो कोणी बिअर पिणारा असेल, त्याला ती पकडायला एकदम सोप्पी पडते. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या आकाराच्या बॉटल अधिक काळ एका जागेवर राहू शकतात. असं म्हटलं जात आहे अशा पद्धतीच्या आकारामुळे शरीर आणि बिअरमधील गर्मी कमी केली जाते. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या आकारामुळे बिअर थंड अधिक वेळ राहते. याशिवाय अनेकजण ते खर्चाशी जोडूनही पाहतात. तसे, बिअर फक्त या प्रकारच्या बाटलीतच येते असे नाही.



गर्मीच्या दिवसात जगात बिअरची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यातून महसूल सुध्दा भारतात अधिक जमा होतो. महाराष्ट्रात मागच्या तीन महिन्यात बिअरची अधिक विक्री झाली आहे.