रेलवेच्या छतावर ही अशी गोल गोल झाकणं का बरं असतात? माहितेय? वाचा…
रेल्वेच्या डब्यांच्या वरच्या बाजूस असलेल्या या झाकणांना रूफ व्हेंटिलेशन असे म्हणतात.
भारतीय रेल्वेकडून दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये देशातील प्रत्येक वर्गातील लोक प्रवास करतात. आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वे बद्दल अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही लहानपणापासून ट्रेनमध्ये प्रवास केला असेल, ट्रेनच्या छतावर गोल झाकणं असतात हे तुम्ही पाहिलं असेलच. ही झाकणे का बसविली जातात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगतो की या झाकणांचा प्रवाशांना कसा उपयोग होतो. जर ट्रेनमध्ये ही झाकणे नसतील तर प्रवाशांना त्रास होऊ शकतो, मग जाणून घेऊयात ही झाकणे लावण्याचे कारण काय?
रेल्वेच्या डब्यांच्या वरच्या बाजूस असलेल्या या झाकणांना रूफ व्हेंटिलेशन असे म्हणतात. ते रेल्वेच्या डब्यांच्या आतून सफोकेशन आणि उबट वास दूर करतात.
गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते, सणासुदीच्या काळात ती अधिकच होते. बहुतेक गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये असे घडते. गर्दीमुळे दमछाक होते.
सफोकेशन कमी करण्यासाठी डब्ब्यांमध्ये रूफ व्हेंटिलेशन बसवले जाते. ज्यामुळे बाहेरून हवा येत राहील आणि रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये हवा खेळती राहील आणि प्रवाशांना प्रवास करताना अडचण येणार नाही.
काही गाड्यांमध्ये या ही गोल झाकणं अगदी लहान असतात. या जाळ्यांमधूनच ट्रेनच्या आतील दमट हवा बाहेर जाते. ही गरम हवा सहज बाहेर पडू शकते.
गरम हवा नेहमी वरच्या दिशेने बाहेर पडते यामागे वैज्ञानिक कारण आहे. गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी असते त्यामुळे या झाकणांमधून गरम हवा वेगाने बाहेर पडू शकते आणि रेल्वेच्या डब्ब्यांमधील सफोकेशन कमी होऊ शकतं. रेल्वेचं तापमान सुद्धा याने व्यवस्थित राहते.