VIDEO : गुगल मिटींग सुरु आणि बायकोला किस करण्याचा मोह, कॅमेऱ्यात कैद ‘तो’ क्षण

सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती गुगल मीटवर चर्चा करत असताना त्याच्या पत्नीला त्याला किस करण्याचा मोह होतो. यावेळी पतीची झालेली घालमेल कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालीय (wife try to kiss while husband on video conference viral video)

VIDEO : गुगल मिटींग सुरु आणि बायकोला किस करण्याचा मोह, कॅमेऱ्यात कैद 'तो' क्षण
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 8:07 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी परवानगी दिली आहे. अनेकांना वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आवडतही आहे. मात्र, काही लोकांना आपल्या कुटुंबियांसमोर काम करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करत आहे. यावेळी अचानक त्याची पत्नी तिथे येते. तिला आपल्या पतीला किस करण्याचा मोह होतो आणि ती तसा प्रयत्न करते. यावेळी पतीची झालेली घालमेल कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालीय. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला मजेशीर रिप्लाय येत आहेत (wife try to kiss while husband on video conference viral video).

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओत एक व्यक्ती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करत आहे. ही मिटिंग सुरु असताना अचानक त्याची पत्नी तिथे येते. ती महिला आपल्या पतीला किस करण्याचा प्रयत्न करते. यावेळी पती प्रचंड अस्वस्थ होतो. तो पत्नीवर भडकतो. काय सुरुय? कॅमेरा सुरु आहे, असं तो व्यक्ती पत्नीला म्हणतो. त्यानंतर तो पुन्हा मिटिंगला जॉईन होतो.

व्हिडीओ बघा:

व्हिडीओ शेअर करताना रुपिन शर्मा यांनी ‘वर्क फ्रॉम होम के खतरे’ असं हिंदीत कॅप्शन दिलंय. या व्हिडीओला त्यांनी 13 फेब्रुवारीला शेअर केलं होतं. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. या व्हिडीओवर अनेकजण मजेशीर कमेंट करत आहेत. “जेव्हा मिटिंगमध्ये असाल तेव्हा खोलीचा दरवाजा बंद करायचा. पण या व्यक्तीच्या प्रेमळ पत्नीला खरंच मानलं पाहिजे”, अशी कमेंट एका यूजरने दिली आहे (wife try to kiss while husband on video conference viral video).

हेही वाचा : 6 लग्न आणि 30 मुलं, शेवटची राणी घाबरुन लंडनला पळाली, पोटच्या पोरीला कैद करणाऱ्या दुबईच्या राजाची क्रूर कहाणी

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.