पत्नीचा अजब कारभार, स्वच्छतेच्या वेडापायी लॅपटॉप, मोबाईल धुतला; पतीने मागितला घटस्फोट
एका माणसाच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन असं सगळंच पाण्याने धुवून टाकलं आहे. पत्नीच्या या अजब कामामुळे पतीने तिला थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळुरु : ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्ड म्हणजे ओसीडी या आजाराचा अजब फटका एका माणसाला बसलाय. या आजाराने ग्रस्त असलेल्या एका माणसाच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन असं सगळंच पाण्याने धुवून टाकलं आहे. पत्नीच्या या अजब कामामुळे पतीने तिला थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्नीला वस्तू पुन्हा पुन्हा धुण्याची सवय
ओसीडी हा एक मानसिक आणि बौद्धिक आजार आहे. या आजारात व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या भीतीने एकच काम वारंवार करतो. वारंवार एकच काम केल्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवरदेखील परिणाम होतो. बंगळुरुमधील एक महिला याच आजाराने त्रस्त होती. ती घराची तसेच वस्तूंची वारंवार साफसफाई करायची. तिने आपल्याच पतीचा लॅपटॉप आणि मोबाईलसुद्धा पाण्यात टाकून साफ केला. परिणामी हजारो रुपयांचे नुकसान तर झालेच पण महत्त्वाचे कागदपत्रे आणि माहितीसुद्धा या लॉपटॉपमध्ये असल्यामुळे तीही गहाळ झाली. याच कारणामुळे आपल्या पत्नीच्या वस्तू धुण्याच्या सवयीमुळे पती शेवटी कंटाळून गेला. त्याने आपल्याला पत्नीपासून घटस्फोट हवाय अशी मागणी केलीय. तर दुसरीकडे या माणसाची पत्नीसुद्धा पतीविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा विचार करत आहेत.
लॅपटॉप, मोबाईल फोन धुतला
मिळालेल्या माहितीनुसार वाद निर्माण झालेल्या या दाम्पत्याचे लग्न 2009 साली झाले. सुरुवातीला या दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत होते. काही दिवसांनी पती इंग्लंडला गेला. यानंतर मात्र सगळं बदलायला लागलं. दोन वर्षानंतर पहिला मुलगा झाल्यानंतर महिलेला वस्तू धुण्याची सवय लागली. कपडे, बूट्स, अशा गोष्टी वारंवार साफ करण्याची या महिलेला सवय जडली. यामध्ये मोबाईल फोन तसेच लॅपटॉपसुद्धा सुटले नाहीत. नंतर या जोडीने काऊन्सलिंग घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पुढे काही काळासाठी दोघांमधील गोष्टी पुन्हा सुरळीत झाल्या.
कंटाळून पत्नीला घटस्फोट देणार
कोरोना महामारी आल्यानंतर मात्र या महिलेची वारंवार वस्तू धुण्याची सवय जास्तच वाढली. ही महिला घर वारंवार सॅनिटाईझ करायची. एका दिवशी तर तिने आपल्याच पतीचा लॅपटॉपसुद्धा धुवून काढला. महिलेच्या अशा वागण्याने त्रस्त होऊन शेवटी पतीने आता पत्नीला घटस्फोट देण्याचा विचार केला आहे.
इतर बातम्या :