Omicronच्या वाढत्या धोक्यानं #NightCurfew Trendingमध्ये, लोक म्हणाले ‘काय गरज आहे याची!’
जीवघेण्या कोरोनामुळे लोकं भयभीत जरी झाली असली, तरी नाईट कर्फ्यूवर मात्र लोक ज्याप्रकारे सोशल मीडियात रिऍक्ट होताना दिसले आहेत, ते पाहून आम्हालाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो डायलॉग आठवला.. मोदी म्हणाले होते.. 'कितने तेजस्वी लोग है हमारे यहॉ पास'...
ब्रिटनमध्ये (Britain covid cases) सलग गेल्या काही दिवसांपासून कहर सुरु आहे. कोरोनाच्या नवा व्हेरीएंट असलेल्या ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या रुग्णसंख्येनं चिंता वाढवली आहे. दररोज लाखभर रुग्णांची भर पडतेय. तिथली आरोग्य (Health) यंत्रणा पुन्हा धास्तावली आहे. तर दुसरीकडे ओमिक्रॉनचे रुग्ण वाढण्याचं प्रमाण महाराष्ट्रातही (Maharashtra) वाढत असल्यानं सगळ्यांच्याच मनात पुन्हा भीती निर्माण झाली आहे. ही भीती कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल कमी आणि लॉकडाऊनबद्दलची जास्त आहे!
लोकं कोरोनापेक्षा जास्त घाबरु लागले आहे, ते कर्फ्यू (Curfew), अटी (Restrictions) आणि लॉकडाऊनला (Lockdown). अशातच गर्दीला रोखण्यासाठीचं पहिलं पाऊल उचललं जातं, ते नाईट कर्फ्यूचं. आता लॉकडाऊनच्या आधी लोकांना भीती आहे, ती नाईटकर्फ्यू पुन्हा राज्यात लागू केला जाण्याची! केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यानं ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाईटकर्फ्यूचा विचार सगळ्यात प्रत्येक राज्यात केला जाईल. अशातच मध्य प्रदेशात तर नाईट कर्फ्यूची घोषणाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच हा नाईट कर्फ्यू वरुन लोकांनी निशाणा साधायला सुरुवात केली आहे.
नाईटकर्फ्यूनं कोरोनाचं संकट दूर थोडीच होईल, असा सवाल लोकांनी उपस्थित केलाय. अनेक ट्विट (Tweet), अनेक मीम्स (meme) आणि पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळत आहेत. जीवघेण्या कोरोनामुळे लोकं भयभीत जरी झाली असली, तरी नाईट कर्फ्यूवर मात्र लोक ज्याप्रकारे सोशल मीडियात रिऍक्ट होताना दिसले आहेत, ते पाहून आम्हालाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) तो डायलॉग आठवला.. मोदी म्हणाले होते.. ‘कितने तेजस्वी लोग है हमारे यहॉ पास‘…
धम्माल सिनेमातला फोटो शेअर करत ट्वीटर हॅन्डल वापरणाऱ्या सत्या संकेतनं निशाणा साधलाय. नाईट कर्फ्यू म्हणजे भिंती नसलेल्या घराच्या दाराआड लपण्यासारखा प्रकार असल्याचा टोला लगावलाय.
#nightcurfew from 11 Pm to 5Am ? Relevance pic.twitter.com/TbAEhFQA9q
— Satya Sanket (@satyasanket) December 23, 2021
बैचेन बंदर नावाच्या ट्वीटर युजनं नाईक कर्फ्यूची तुलना माधुरी दीक्षितच्या या फोटोतील ओढणीशी केलंय. बैचेन बंदरचं असं म्हणणंय की, ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गात नाईट कर्फ्यू हा तितकाच निरुपयोगी आहे, जितकी या फोटोत माधुरी दीक्षितची ओढणी…
Night curfew is as useless as Madhuri’s dupatta in this pic. #nightcurfew pic.twitter.com/aNQyY2G3f4
— Bechain Bandar (@Bechain_bandarr) December 23, 2021
लोक तर सरकारला निवडणुका आणि महामारीतल्या दुटप्पी भूमिकेवरुनही सुनवायला कमी करत नाही आहे. कोरोना काळात नाईट कर्फ्यू लावणं योग्य पण, निवडणुकीच्या मोठमोठ्या प्रचार सभा रद्द करणं काही शक्य नाही, अशा आशयाची पोस्ट केली आहे.
Government during Pandemic#nightcurfew pic.twitter.com/74cXb8wXaT
— Thunder (@iamthunder847) December 24, 2021
तर रात्रीच्या वेळी काम असणाऱ्या काहींना मात्र नाईट कर्फ्यूच्या शक्यतेनं चांगलाच घाम फोडलाय. अगदी नायक सिनेमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेताना अनिल कपूरला फुटला होता, तसाच!
“State Governments announcing #nightcurfew“
People with their new year plans booked: pic.twitter.com/pV43DMFUyr
— Naman Sachdev (@nnamansachdev) December 24, 2021
आता कुठं नाईट कर्फ्यू संपला होता आणि लगेच पुन्हा नाईट कर्फ्यूच्या गोष्टी ऐकून लोकांना मुन्नाभाई एमबीबीएसचा हा सीनही आठवलाय.
People after knowing that #nightcurfew may be imposed soon in their state too are like.. pic.twitter.com/LesWb4ANdf
— Crime Master Gogo ?? (@vipul2777) December 23, 2021
मात्र या सगळ्या मीम्स, टीका-टीप्पणीत ओमिक्रॉन हातपाय पसरतोय. याची जाणीव या एका ट्वीटनं सगळ्यानं करुन दिली आहे. त्याला कुणी सीरियसली घेणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. बाकी या महमारीतही हसत-खेळत कसं जगत राहायचं, याचे आपआपले पर्याय लोकांनी शोधून काढलेत.
पाहा व्हिडीओ –
Govt imposed #nightcurfew
Le omicron, delta and other varient: pic.twitter.com/hmYuQf39H6
— vixhakha (@vixhakha) December 24, 2021
महाराष्ट्रात काय स्थिती?
राज्यात गुरुवारी (23 December) ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची उच्चांकी नोंद झाली होती. गुरुवारी दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले होती. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील होते. मुंबईत 5, उस्मानाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाईंदर आणि नागपुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला होते. आता हा वाढत्या रुग्णांचा आकडा नियंत्रणात कसा ठेवायचा, याचं आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर असणार आहे.