मॅकडोनाल्ड ही सगळ्यांची आवडती जागा आहे. लोकांना हे ठिकाण विशेषतः तरुण पिढीला हे ठिकाण प्रचंड आवडतं. मॅकडोनाल्ड आपल्या सर्व्हिसला खूप गंभीरतेने घेते. लोकं बरेचदा मॅकडोनाल्डच्या सर्व्हिस कडून काही चूक झाली की ट्विटरला त्यांना टॅग करून ते दाखवून सुद्धा देतात. विशेषतः परदेशात हा प्रकार खूप आहे. तिथे नागरिक अशा बाबतीत प्रचंड सजग आहेत. असाच एक किस्सा घडलाय. एक महिला मॅकडोनाल्डमध्ये कॉफी प्यायला गेली. त्यानंतर तिला खूप त्रास झाला. महिलेचं असं म्हणणं आहे की मॅकडोनाल्ड कॉफी ऐवजी कुठलं तरी केमिकल तिला प्यायला दिलं. यासंदर्भात तिने मैकडोनाल्डवर केस सुद्धा केली आहे.
ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव शेरी असून या महिलेनं नुकतीच तिच्या तक्रारीची एक प्रत मॅकडोनाल्डच्या अमेरिकन शाखेला पाठवली आहे.
या तक्रार पत्रात या महिलेनं फूड चेन मॅकडोनाल्डवर अनेक आरोप केले आहेत. या महिलेने आपली तक्रार संबंधित सरकारी प्राधिकरणाकडेही पाठवली आहे. या महिलेने मॅकडोनाल्ड्सकडे 105 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, महिलेने आरोप केलाय की ती मॅकडोनाल्डच्या शाखेत गेली होती जिथे तिने कॉफीची ऑर्डर दिली होती परंतु त्या बदल्यात तिला केमिकल दिली गेली होती.
सुरुवातीला तिला समोर काय दिलंय ते समजत नव्हतं पण ते प्यायल्यानंतर तिला प्रचंड त्रास झाला. या केमिकलमुळे तिला घशाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. याशिवाय इतरही अनेक समस्यांशी ती झगडत आहे.
तिच्या घशाचा त्रास इतका वाढला की तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असेही या महिलेने म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्याला देण्यात आलेल्या कॉफीचा फक्त एक घोटच आपण प्यायला आणि तिला लगेच त्रास होऊ लागला, असं खुद्द महिलाच सांगत आहे. सध्या या महिलेचं हे प्रकरण कोर्टात असून त्याचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही.