गरोदर महिला बघून सुद्धा तिला दया आली नाही, कुत्र्यासाठी भांडली!

माझ्या कुत्र्यालाही कुत्रा म्हणू नका त्याच्या नावाने हाक मारा असं म्हणणारी देखील लोकं आता अस्तित्वात आहेत. कुत्रप्रेम असणारी लोकं आपल्या कुत्र्याला अगदी बांधून ठेवायला सुद्धा नाहीच म्हणतात. मागे एक व्हिडीओ वायरल झाला होता ज्यात एक कुत्रा एका लहान मुलाला लिफ्ट मध्ये चावतो. आठवतोय? असाच एक लिफ्टमधला व्हिडीओ पुन्हा समोर आलाय.

गरोदर महिला बघून सुद्धा तिला दया आली नाही, कुत्र्यासाठी भांडली!
dog video in liftImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 4:21 PM

मुंबई: सगळं प्रेम एकीकडे आणि लोकांचं कुत्र्यावर असणारं प्रेम एकीकडे! होय. डॉग लव्हर्सला काय तोड नाही. त्यांच्या इतकं प्रेम तर एखादी व्यक्ती सुद्धा कोणत्या व्यक्तीवर करत नसेल. बरेचदा तर ही डॉग लव्हर्स असणारी कॅटेगिरी सोशल मीडियावरच एकमेकांना भिडते. कुत्र्यावर असणारं इतकं प्रेम त्यांना कधी कधी सगळ्या हद्दी पार करायला लावतं. आता तुम्ही म्हणाल छे छे! असं कसं? कुत्र्यांसाठी कोण का भांडेल? पण हे होतंय. माझ्या कुत्र्यालाही कुत्रा म्हणू नका त्याच्या नावाने हाक मारा असं म्हणणारी देखील लोकं आता अस्तित्वात आहेत. कुत्रप्रेम असणारी लोकं आपल्या कुत्र्याला अगदी बांधून ठेवायला सुद्धा नाहीच म्हणतात. मागे एक व्हिडीओ वायरल झाला होता ज्यात एक कुत्रा एका लहान मुलाला लिफ्ट मध्ये चावतो. आठवतोय? असाच एक लिफ्टमधला व्हिडीओ पुन्हा समोर आलाय. ज्यात कुत्रं घेऊन लिफ्ट मध्ये असणारी महिला इतर लोकांशी वाद घालतेय.

झालं असं की एका लिफ्ट मध्ये एक महिला आपल्या कुत्र्याला घेऊन गेली. तिथे असणारं एक कपल तिला म्हणालं की जी जाळी कुत्र्याच्या गळ्यात आहे ती तुम्ही त्याच्या तोंडाला बांधा म्हणजे ते कुत्रं चावणार नाही. कुत्रं घेऊन उभी असणारी महिला हे करायला तयार नव्हती. तिने कुत्र्याच्या तोंडाला जाळी लावायला नकार दिला. याच मुद्द्यावरून वाद सुरु झाला. यात जोडप्या मधील पुरुष त्या कुत्र्यासोबतच्या महिलेला म्हणाला, “कशी बाई आहे गं तु?” तर त्यावर ती महिला म्हणाली, “तुझ्या बायको पेक्षा तर नक्कीच चांगली आहे.” या वाक्यावरून लोकांनी या महिलेला प्रचंड ट्रोल केलंय.

महिलेचं कुत्रं प्रेम सुद्धा इतकं आहे की कमेंट बॉक्समध्ये लोकांनी काय बरोबर आणि काय चूक हेच सांगायला सुरुवात केलीय. त्या जोडप्यामध्ये ती महिला गरोदर असल्यामुळे लोकांनी असंही म्हटलं की, “काय फरक पडला असता गळ्यातली जाळी तोंडाला लावली असती तर? त्या महिलेला तो कुत्रा चावला असता तर किती इंजेक्शन लावावे लागले असते.”

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.