हनुमानाचं चित्र काढलं पण ते कसं काढलं हे बघण्यासारखं!
कलाकार सुद्धा शून्यातून जग निर्माण करू शकतो. मग विचार करा एखादी स्त्रीच जर कलाकार असेल तर? तर तिला नक्कीच तोड नाही. तुम्ही अनेक कलाकार पाहिले असतील जे चांगले चांगले चित्र काढतात. ही चित्रे मोहून टाकणारी असतात.
मुंबई: एक स्त्री काहीही करू शकते! स्त्री म्हणजे शक्ती, कुठल्याही संकटकाळी ती न डगमगता सगळं पुन्हा शून्यातून उभं करू शकते. कलाकारही अगदी तसाच असतो. कलाकार सुद्धा शून्यातून जग निर्माण करू शकतो. मग विचार करा एखादी स्त्रीच जर कलाकार असेल तर? तर तिला नक्कीच तोड नाही. तुम्ही अनेक कलाकार पाहिले असतील जे चांगले चांगले चित्र काढतात. ही चित्रे मोहून टाकणारी असतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो व्हिडीओ एका महिलेचा आहे. ही महिला इतकं अप्रतिम चित्र काढतेय की बास्स!
ही महिला हनुमानाचं चित्र काढतेय. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? हनुमानाचं चित्र तर भल्या भाल्यांनी काढलंय. पण या महिलेने जरा हटके चित्र काढलंय. तिने न बघता हे चित्र काढलंय. अहो नुसतं न बघता नाही, तिने उलटे हात करून हे चित्र काढलय. चित्र काढताना तिला ते दिसतंही नाही पण तरीही तिने हे चित्र अचूक पद्धतीने काढलंय. तिची ही चित्र काढायची पद्धत सगळ्यांना आवडलीये. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
कुणी ‘तुमच्या कलात्मकतेला सलाम’ म्हणतंय, तर कुणी म्हणतंय की, “ही अप्रतिम प्रतिभा आहे.” तर काही युजर्स असेही म्हणत आहेत की, “महिलेसमोर आरसा असावा, ज्यात ती पाहून हे चित्र बनवत होती.” एका युजरने लिहिले आहे की, “ती आरशात पाहून चित्र बनवत असली तरी दोन्ही हात मागे ठेवून कलात्मकता करणे सोपे नाही.”
View this post on Instagram
या शानदार व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे, तर 1 लाख 33 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.