जबरदस्त ट्रिक! पायांच्या मदतीने कमावते महिन्याला 5 लाख
ती अशीच शक्कल लढवून कमाई करत आहे. ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचे नाव एमिलिया असून ती लंडनची रहिवासी आहे. 28 वर्षीय एमिलिया नर्स म्हणून काम करत होती. मग अचानक एके दिवशी तिने नोकरी सोडली आणि कंटेंट क्रिएशनला सुरुवात केली.

मुंबई: आजच्या युगात कल्पना इतकी महत्त्वाची आहे की लोक त्यांच्या नुसत्या कल्पनेवर भरपूर पैसे कमवतात. कुठल्या कुठल्या गोष्टींवर पैसे कमावले जाऊ शकतात? ब्रिटनची एक महिला सध्या बरीच चर्चेत आहे. ती अशीच शक्कल लढवून कमाई करत आहे. ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचे नाव एमिलिया असून ती लंडनची रहिवासी आहे. 28 वर्षीय एमिलिया नर्स म्हणून काम करत होती. मग अचानक एके दिवशी तिने नोकरी सोडली आणि कंटेंट क्रिएशनला सुरुवात केली. मात्र, ती कुठलीही व्लॉगिंग आणि स्वयंपाक करत नव्हती तर तिच्या पायाचे फोटो अपलोड करत होती. अचानक तिची कल्पना हिट ठरली. एका वेबसाईटने तिच्याशी संपर्क साधला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमिलियाला ‘फन विथ फूट्स’ नावाच्या वेबसाईटवरून कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. तिच्या पायाच्या सुंदर फोटोंच्या बदल्यात ही कंपनी त्यांना पैसे देते. मग एमिलियाने इथे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आणि पैसे कमावायला सुरुवात केली. इतकंच नाही तर इतर ठिकाणीही तिने पायांची छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात केली. हे सर्व करून ती महिन्याला 5 हजार पौंड म्हणजेच जवळपास 5 लाख रुपये कमावते.
आता ते आपले फोटो इतरत्रही पोस्ट करतात. एमिलियाने सांगितले की, काही लोक तिला विचित्र रिक्वेस्टही करतात, यासाठी लोक तिला पैसेही देतात. इतकंच नाही तर याच कारणामुळे ती आपल्या पायांची विशेष काळजी घेते. पाय फ्रेश ठेवण्यासाठी ती फूटकेअर रुटीन फॉलो करते असे ती सांगते. तिला तिच्या पायावर डाग नको आहे. तिचे पाय सुंदर दिसले तर ते पाहण्यासाठी लोक पैसे खर्च करतील, असा तिचा विश्वास आहे.