घराची दुरुस्ती चालू असताना 135 वर्षे जुनी व्हिस्की सापडली, सोबत एक चिठ्ठी सुद्धा होती
या महिलेच्या जुन्या घरात प्लम्बिंगचे काम सुरू होते. दरम्यान, एका प्लंबरने भिंतीच्या बाजूला लावलेले लाकूड काढले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.
जुन्या घरात काम सुरू असताना अनेकदा काही आश्चर्यकारक गोष्टी सापडतात. एका स्त्रीला असे काहीतरी मिळाले जे जाणून घेण्यात बऱ्याच लोकांना स्वारस्य आहे. दुसरे तिसरे काही नसून ही व्हिस्कीची बाटली आहे. ही बाटली १३५ वर्षे जुनी आहे. इतकंच नाही तर बाटलीसोबत व्हिस्कीही सापडली आहे.
स्कॉटलंडमधील एका महिलेसोबत ही घटना घडलीये. ही महिला स्कॉटलंडमधील एडिनबर्गमध्ये राहते. एलिड स्टिप्सन असं या महिलेचं नाव आहे.
या महिलेच्या जुन्या घरात प्लम्बिंगचे काम सुरू होते. दरम्यान, एका प्लंबरने भिंतीच्या बाजूला लावलेले लाकूड काढले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.
त्या ठिकाणी त्याला काहीतरी दिसलं. जेव्हा त्याने व्यवस्थित पाहिले तेव्हा त्यावर एक बाटली पडलेली होती. यानंतर प्लंबरने महिलेला बोलावून दाखवले.
जेव्हा त्या महिलेने ते पाहिले, तेव्हा तिला आश्चर्य वाटले. नीट पाहिलं तर ती व्हिस्कीची जुनी बाटली होती. त्यावर तारीखही लिहिण्यात आली होती. आश्चर्य म्हणजे एक पत्र तिथे पडलेले आढळून आले.
रिपोर्टनुसार, या पत्रावर तारीख ६ ऑक्टोबर १८८७ होती. जेम्स रिची आणि जॉन ग्रेव्ह यांनी हा मजला बनवला होता, पण व्हिस्कीच्या या बाटलीतून त्यांनी दारू प्यायली नाही, असे लिहिले होते. ही बाटली आणि हे पत्र वाचून महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला.