भारतात जन्माला आलं 4 पायाचं बाळ! बघ्यांची गर्दी, Photo Viral
सध्या या तपासणी करण्यात येत असून डॉक्टर मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक घटना समोर आली आहे, जिथे चार पाय असलेल्या मुलीचा जन्म झाला आहे. बाळाचा जन्म होताच रुग्णालयात खळबळ उडाली आणि बाळाचे कुटुंबीयही चिंतेत पडले, मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात बरीच गर्दी होत आहे आणि लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या या मुलीची तपासणी करण्यात येत असून डॉक्टर मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात ही घटना घडलीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरती कुशवाहा नावाच्या महिलेने गुरुवारी रात्री उशिरा एका चार पायांच्या बाळाला जन्म दिला आहे.
ही बातमी समोर येताच त्याची बातमी सोशल मीडियावरही पसरली. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांची चांगलीच धांदल उडाली आणि रुग्णालयात मोठी गर्दी झाली. काही जण या बाळाला चमत्कारिक म्हणत आहेत, तर काही जण याला देवाचा अवतार सुद्धा मानत आहेत.
दुसरीकडे, मुलाच्या जन्मानंतर डॉक्टरांच्या टीमने मुलाची तपासणी सुरू केली आहे. एका मोठ्या कारवाईत डॉक्टरांनी बाळाचे इतर दोन पाय शस्त्रक्रियेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला, तरीही त्यावर अजूनही चर्चा सुरू आहे.
रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांचं म्हणणं आहे की, सध्या या बाळाच्या चाचण्या केल्या जात असून ती जर पूर्णपणे निरोगी असेल तर तिचे दोन अतिरिक्त पाय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जातील.
संपूर्ण देशात अशी केवळ चारच मुले जन्माला आली असून मध्य प्रदेशातील ही पहिलीच घटना असल्याचे या प्रकरणाशी संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
दोन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही पाय काढता येतील आणि शस्त्रक्रियेनंतर, मूल सामान्य स्थितीत परत येईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. खरं तर, या प्रकरणाचे वर्णन वैद्यकीय भाषेत इशिओपेगासचे प्रकरण म्हणून केले जात आहे. लाखो मुलांपैकी एका मुलामध्ये अशा प्रकारे अतिरिक्त अवयव विकसित होतात, असे सांगितले जात आहे.