नोकरीच्या शोधात महिलेने शेअर केला बिकिनी मधला फोटो, ऑफर्सचा पडला पाऊस!
टेडी स्वान अवघ्या 24 वर्षांची आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून ती एका बारमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती, पण आता ती दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहे.
क काळ असा होता की लोकांना नोकरीसाठी कंपन्यांना ईमेल करावे लागायचे किंवा सीव्हीसह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकावे लागायचे, परंतु सोशल मीडिया आल्यापासून, या सर्व गोष्टींचा ट्रेंड जवळजवळ संपुष्टात आला आहे. आता एकतर लोक लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने नोकरीसाठी अर्ज करतात किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे नोकरी शोधतात. तसे पाहिले तर नोकरी मागायची एक प्रोफेशनल पद्धत आहे. लोक त्यांचा सीव्ही तसेच त्यांचे फोटो आणि कामाचे तपशील एखाद्या इमेल करून पाठवतात. पण एका ब्रिटिश महिलेने नोकरी मागण्याचा अजब मार्ग अवलंबलाय, तिची ही पद्धत इतकी हटके आहे की लोक तिला चांगलंच ट्रोल करतायत.
या महिलेने नोकरी मागण्यासाठी सोशल मीडियावर आपला बिकीनी फोटो टाकला होता ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, टेडी स्वान असं या महिलेचं नाव आहे.
टेडी स्वान अवघ्या 24 वर्षांची आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून ती एका बारमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती, पण आता ती दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहे.
यासाठी तिने फेसबुकवर आपल्या बिकीनीचा फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘मी नव्या वर्षात नव्या नोकरीच्या शोधात आहे. मी नोकरीसाठी कुठेही जाऊ शकते. माझ्याकडे स्वतःची गाडी आहे. मी यापूर्वी फार्मसी, रिटेल, बालसंगोपन परिचारिका आणि रुग्णवाहिका चालक म्हणून काम केले आहे.”
डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, टेडी स्वान बॅकपॅकर आहे. खरंतर भारतासह अनेक देशांमध्ये प्रवासाची ही नवी पद्धत आजकाल खूप लोकप्रिय आहे, यालाच बॅकपॅकिंग म्हणतात.
यामध्ये लोक आपलं सर्व सामान एका मोठ्या पिशवीत भरून ते पाठीवर घेऊन विविध देशांच्या प्रवासाला निघतात. ते स्वस्त हॉटेल किंवा लॉजमध्ये राहतात. टेडी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून तिथला खर्च भागवण्यासाठी ती बारमध्ये काम करत आहे.
नव्या नोकरीसाठी तिने आपला बिकीनी फोटो फेसबुकवर पोस्ट करताच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. कुणी नोकरीसाठी असे फोटो शेअर करणं योग्य नसल्याचं सांगतंय, तर कुणी म्हणतंय की, जर ती नोकरीच्या शोधात होती तर ती कधीही बिकीनीतले फोटो शेअर करणार नाही.
मात्र, टेडीला लोकांच्या या गोष्टींची पर्वा नाही. ती म्हणते की तिला स्वत: अशा लोकांसोबत काम करायला आवडणार नाही ज्यांना तिचे कपडे पाहून नोकरी द्यायची इच्छा नाही. नोकरीसाठी ऑफर्स येत असल्याचं ती सांगते, आता कुठे काम करायचंय हे ठरवायचं आहे.