बापरे! महिलेचा सिंहांसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ पाहिल्यावर जणू काही ती स्त्री सिंहांबरोबर नव्हे, तर आपल्या पाळीव कुत्र्यांबरोबर फिरायला बाहेर पडली आहे.
एका महिलेचा तीन सिंहांसोबत फिरतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. ही क्लिप कंटेंट क्रिएटर जेनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती, ज्यामध्ये जंगलात तीन सिंहांसोबत एक महिला फिरताना आपण पाहू शकतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर जणू काही ती स्त्री सिंहांबरोबर नव्हे, तर आपल्या पाळीव कुत्र्यांबरोबर फिरायला बाहेर पडली आहे, असं वाटतं. ‘जंगलाचा राजा’ सिंह सुद्धा बाईबरोबर खूप कम्फर्टेबल दिसतो.
जेनच्या सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी झालेल्या चकमकीची छायाचित्रे आणि व्हिडिओंचा पूर आला आहे. 12 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या क्लिपला आतापर्यंत 3,16,000 हून अधिक लाईक्स आणि 6.9 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
तसेच यावर मोठ्या प्रमाणात युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले- सिंहांनी हल्ला केला तर त्यांना दोष देऊ नका.
View this post on Instagram
त्याचबरोबर काहींनी लिहिले की, आता या पृथ्वीतलावरील कोणताही प्राणी स्त्रीवर हल्ला करू शकत नाही. तर आणखी एका युझरने लिहिले की, सिंहाने या महिलेला त्याच्यासोबत चालण्याची परवानगी दिलीये त्यामुळे ही महिला खूप खास आहे.