कार वगैरे तर सोडाच रेल्वे चालवताना मोबाईल वापरत होती, कहर व्हिडीओ!
लोकांना गाडी चालवताना फोन न वापरण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक भयानक गोष्ट दाखवण्यात आली आहे.
मुंबई: स्मार्टफोनबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. आजच्या काळात तुम्हाला खूप कमी लोक सापडतील ज्यांच्या हातात स्मार्टफोन नाही. आता ही लोकांची गरज बनली आहे आणि काही लोकांसाठी ही फॅशन सुद्धा आहे. काही लोक फोनचे ‘बग’ बनले आहेत, हे तुम्ही पाहिलं असेलच म्हणजे नेमकं काय? तर फोनचं प्रचंड वेड असणं, व्यसन लागणं. गाडी चालवतानाही ते फोन वापरत राहतात. लोकांना गाडी चालवताना फोन न वापरण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक भयानक गोष्ट दाखवण्यात आली आहे.
एक महिला ट्रेन चालवत होती. रेल्वे चालवताना ही चक्क मोबाईल वापरत होती. मग ती मोबाईल वापरण्यात इतकी बिझी झाली की तिने समोर पाहिलंही नाही आणि मग ट्रेन थेट दुसऱ्या ट्रेनवर जाऊन धडकली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही महिला ड्रायव्हिंग सीटवर बसून आरामात मोबाईल चालवण्यात कशी व्यस्त आहे. दरम्यान, जेव्हा ती वर बघते तेव्हा वेळ निघून गेलेली असते, तोवर समोरून दुसरी ट्रेन येत असते. ती घाबरते आणि तिच्या हातातून मोबाईल पडतो. ती ब्रेक लावण्यासाठी बटण दाबू लागते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तिचा हलगर्जीपणा थेट दोन रेल्वेची धडक घडवून आणतो. हा व्हिडीओ धक्कादायक आहे.
driving a train while on a smartphone pic.twitter.com/716iOgEr6m
— clips that go hard (@clipsthatgohard) April 19, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @clipsthatgohard नावाच्या आयडीसह हा धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एक मिनिटांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.