अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या विमानात महिलेने काढले कपडे, क्रू मेंबरला केली मारहाण

एका महिलेने चक्क विमानात कपडे काढले आणि ती कपडे काढून ती विमानात फिरत होती. बरं एवढं करून ती थांबली नाही तिने क्रू मेंबर्सला मारलं आणि...

अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या विमानात महिलेने काढले कपडे, क्रू मेंबरला केली मारहाण
Vistara AirlinesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 4:08 PM

विमान प्रवासादरम्यान अनेक किस्से घडतात. हे किस्से व्हायरल सुद्धा होतात. कधी कुणी प्रवासादरम्यान भांडतं काय तर कुणी नाचतंच काय. मग काय अशा गोष्टींचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. अगदी हे कुठल्या एअरलाइन्सच्या विमानात घडलं ते काय घडलं इतकं सविस्तर पद्धतीनं व्हायरल केलं जातं. असाच एक किस्सा व्हायरल होतोय. एका महिलेने चक्क विमानात कपडे काढले आणि ती कपडे काढून ती विमानात फिरत होती. बरं एवढं करून ती थांबली नाही तिने क्रू मेंबर्सला मारलं आणि त्यांच्यावर थुंकली सुद्धा. काय घडलं नेमकं जाणून घेऊ.

झालं असं की अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात (यूके-256) इटलीहून आलेल्या एका महिलेने विमानात कपडे उतरवून फिरायला सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला. या महिलेने क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन केले आणि हाणामारीही केली. विमान मुंबईत उतरताच क्रू मेंबरच्या तक्रारीवरून महिलेला अटक करण्यात आलीये.

इटलीत राहणाऱ्या या महिलेचे नाव पाओला पेरूसिओ असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानात ती मद्यधुंद अवस्थेत होती. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी महिलेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तिला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, त्यानंतर महिलेला जामीन मंजूर करण्यात आलाय.

इटलीची रहिवासी असलेली ही महिला इकॉनॉमी क्लासचे तिकीट असताना फ्लाइट दरम्यान बिझनेस क्लासमध्ये बसली होती. क्रू मेंबरने तिला आपल्या सीटवर जाण्यास सांगितल्यावर ती महिला उद्धटपणे वागू लागली. तिने क्रू मेंबर्सपैकी एकाला मुक्का मारला आणि एकावर थुंकली. यानंतर महिलेने आपले कपडे उतरवून फिरायला सुरुवात केली.

महिलेच्या अशा वागण्याने विमानात खळबळ उडाली. यानंतर कॅप्टनच्या सूचनेनुसार क्रू मेंबरने महिलेला पकडून कपडे घातले. विमान उतरल्यावर महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.