AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Saree : साडी तर बनवली, पण ती नेसून कुठे फिरणार? ‘हा’ अजब Video पाहून यूझर्स करतायत सवाल

Weird Saree Video : चिप्स (Chips) खाल्ल्यानंतर बटाटा चिप्स रॅपर्स(Potato Chips Wrappers)चे काय करायचे? व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला बटाटा चिप्सच्या पॅकेटपासून बनवलेली साडी (Saree) नेसलेली दिसत आहे. व्हिडिओ पाहून यूझर्सही हैराण झाले आहेत.

Viral Saree : साडी तर बनवली, पण ती नेसून कुठे फिरणार? 'हा' अजब Video पाहून यूझर्स करतायत सवाल
बटाटा चिप्सच्या पॅकेटपासून बनवलेली साडी नेसलेली महिला
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 6:08 PM

Weird Saree Video : देशात टॅलेंटची कमतरता नाही. पण काही लोकांमध्ये प्रतिभा इतकी भरलेली असते की त्यांच्या कारनाम्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे डोळे भिरभिरतील. चिप्स (Chips) खाल्ल्यानंतर बटाटा चिप्स रॅपर्स(Potato Chips Wrappers)चे काय करायचे? साहजिकच तुम्ही ते डस्टबिनमध्ये फेकणार. पण या रॅपर्सचा वापर करून एका महिलेने जे काही बनवले आहे ते पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सही हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला बटाटा चिप्सच्या पॅकेटपासून बनवलेली साडी (Saree) नेसलेली दिसत आहे. होय, तुम्ही ते अगदी बरोबर वाचले आहे. या महिलेने चिप्सच्या फॉइल रॅपरपासून साडी बनवली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने बटाटा चिप्सचे पॅकेट हातात धरले आहे.

बटाट्याच्या चिप्सच्या रॅपरपासून बनवली साडी

या महिलेने बटाट्याच्या चिप्सच्या रॅपरपासून साडी बनवली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक चक्रावले आहेत. या अनोख्या साडीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर BeBadass.in नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ब्लू लेस आणि साडीसाठी प्रेम. 21 जानेवारी रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत साडेपाच हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही यूझर्सना ते मजेदार वाटले, तर काहींनी डोक्याला हात लावला.

‘कुठे घालून फिरणार?’

एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘साड़ी हो तो ऐसी हो वरना ना हो.’ त्याचवेळी एक महिला यूजर म्हणते, की मी साडीप्रेमी आहे आणि मला ते अजिबात आवडले नाही. कला आणि सर्जनशीलतेच्या नावाखाली लोक काहीही करत असतात. आणखी एका यूझरने विचारताना लिहिले, की मॅडम तुम्ही साडी बनवली आहे, पण ती नेसून कुठे फिरणार? याशिवाय हा व्हिडिओ पाहून अनेक यूझर्स आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींनी मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by BeBadass.in (@bebadass.in)

Viral : ‘हे’ Aadhar Card नाही, लग्नपत्रिका आहे! छत्तीसगडच्या ‘या’ नवरदेवानं बनवलं अनोखं डिझाइन

Lion Video : …अन् सफारीदरम्यान अचानक जंगलाचा राजा आला समोर…

Dog rescue : …अन् जळत्या कारमधून बाहेर काढत पोलिसानं कुत्र्याचा ‘अशा’प्रकारे वाचवला जीव, Video Viral

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.