कॅमेरा ऑन केला आणि पळाली…या VIDEO ला 3 कोटी व्ह्यूज; लोक हैराण

इन्स्टाग्रामवर एक साधा व्हिडीओ 3 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओत एक महिला पिवळ्या ड्रेसमध्ये धावत असताना दिसते. गाण्याचा वापर आणि कबुतराचा समावेश असलेला हा व्हिडीओ कोणत्याही खास कंटेंटशिवाय व्हायरल झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर व्हायरलिटीचे रहस्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हा व्हिडीओ, त्यावरील प्रतिक्रिया आणि त्याचे सोशल मीडियावरचे परिणाम यावर हा लेख प्रकाश टाकतो.

कॅमेरा ऑन केला आणि पळाली...या VIDEO ला 3 कोटी व्ह्यूज; लोक हैराण
khushi video
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 11:26 AM

कधी कधी सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहून अचंबा वाटतो. कारण या व्हिडिओमध्ये कोणताही मनोरंजक कंटेट नसतो. अनेकदा तर लोक फक्त व्हिडीओ पाहून हसतात. किंवा नंतर हा व्हिडीओ स्कीप करतात. आता इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिलेने कोणतंही गाणं गायलं नाही. तिने डान्सही केला नाही. किंवा तिने कोणतीही कलाकुसरही दाखवली नाही. हा व्हिडीओ अश्लीलही नाही. पण तरीही 3 कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 3 कोटीहून अधिक व्ह्यूज, 8 लाखाहून अधिक लाइक्स आणि हजारो कमेंट या व्हिडीओला मिळाले आहेत. त्यामुळे लोकही अचंबित झाले आहेत.

khushivideos1m नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लोक व्हिडीओ पाहून त्यावर कमेंट करत आहेत. आपलं मत व्यक्त करत आहेत. या व्हिडीओत काही खास नाहीये. पण हा व्हिडीओ पाहून लोक हैराण होत आहेत. यावर अनेकांनी तर कमेंटचा पाऊसच पाडला आहे. या व्हिडीओवर स्विगीनेही कमेंट केली आहे. शेजारच्या इमारतीत ऑर्डर असेल तर आमचे डिलिव्हरी बॉइज असेच पळतात, अशी कमेंट स्विगीने केली आहे.

कोट्यवधी लोक पाहत आहेत

हा व्हिडिओ पाहिल्यावर सोशल मीडियावर काहीही व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे. काही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आपल्या व्हिडीओला व्ह्यूज मिळावेत म्हणून अनेक प्रकारच्या करामती करतात. चांगले कपडे घालून डान्स करतात, गाणी म्हणतात, स्टंट करतात, काही तर चक्क रडतात. पण या महिलेने तिच्या व्हिडीओत यापैकी काहीच केलं नाही. तरीही तिचा व्हिडीओ तीन कोटीहून अधिक लोकांनी पाहिलाय हे नवलच.

आणि हे घडलं…

या व्हिडिओत नेमकं काय आहे? तर पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली महिला येते. कॅमेरा ऑन करते आणि मागे वळते. त्यानंतर एकदम जोरात पळून जाते. ती पळत असताना बॅकग्राऊंडला ‘तू रुटा तो रुठ के इतनी दूर चल जाऊँगी’ हे गाणं वाजतं. या व्हिडीओत कबूतरही दिसतं. बस्स या व्हिडीओत एवढंच आहे. दुसरं काही नाही. तरीही या व्हिडीओला 60 हजाराच्या जवळपास कमेंट आल्या आहेत. एका नेटकऱ्याने तर मुन्नी पुन्हा पाकिस्तानात गेली, अशी मजेदार कमेंट केली आहे. तुझा अभिनय पाहून बिच्चारं कबूतरही आत्महत्या करत आहे, असंही त्याने म्हटलंय.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....