Video | सुरुवातीला महिलेला व्यायामाचा कंटाळा, पैसे पाहताच मूड चेंज ! पाहा व्हायरल व्हिडीओ
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका पतीने आपल्या पत्नीकडून व्यायाम करुन घेण्यासाठी चांगलंच डोकं वापरलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका पतीने आपल्या पत्नीकडून व्यायाम करुन घेण्यासाठी चांगलंच डोकं वापरलं आहे. (women doing exercise for money video went viral on social media)
व्हिडीओमध्ये काय आहे ?
व्यायामामुळे कोणताही आजार किंवा व्याधीचा हल्ला आपल्यावर होत नाही. याच कारणामुळे प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम करावा अस सला आरोग्यविषय तज्ज्ञ देतात. मात्र काही लोकांना व्यायाम करण्याचा चांगलाच कंटाळा असतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही महिलेला व्यायामाचा कंटाळा आल्याचे दिसते आहे.
व्यायाम करण्याचा महिलेला कंटाळा
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला आणि परुष दिसत आहेत. व्हिडीओतील महिला व्यायाम करते आहे. ही महिला व्यायाम करत असली तरी ती तेवढी उत्सुक दिसत नाहीये. मात्र, या महिलेने व्यायाम करावा असे व्हिडीओतील पुरुषाला मनातून वाटते आहे. परिणामी या पुरुषाने महिलेकडून व्यायाम करुन घेण्यासाठी चांगलंच डोकं लावलं आहे.
पैसे पाहताच पूर्ण ताकदीने व्यायाम
व्हिडीओतील परुषाने आपल्या तोंडात पैशांची नोट पकडली आहे. तसेच महिलेच्या समोर येत तिला तोंडाने नोट घेण्याचे हा पुरुष सांगतो आहे. सुरुवातीला व्यायामास नकार देणारी ही महिला पैसे पाहून पूर्ण ताकदीने व्यायाम करु लागते आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत पुरुषाने केलेल्या युक्तीची प्रशांसा केली आहे. पैसे पाहून महिलेचे बदलले रुप नेटकऱ्यांना चांगलेच भावले आहे.
इतर बातम्या :
Video | माणसाने जिंवत साप पकडला अन् नाकात टाकला, पुढे काय झालं ? एकदा पाहाच
Photo : पाहावं ते नवलंच.., पाहा झोम्बीच्या हातासारख्या फंगसची दुर्मिळ प्रजाती
Video | मानवी वस्तीत मगर शिरल्याने एकच खळबळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
(women doing exercise for money video went viral on social media)
सात दिवसात जप्त केलेली वाहनं घेऊन जा, अन्यथा लिलाव करु, पोलिसांचा वाहनमालकांना इशाराhttps://t.co/gxozy8sGsb#Nashik | #AmbadPolice | #SeizedVehicles |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2021