दे दणादण! महिलांचं भांडण बघून तर तुम्ही डोक्याला हातच लावाल…
महिलांच्या भांडणाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ फक्त बघितलेच जात नाहीत तर ते तितकेच शेअर देखील केले जातात. एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जिथे तीन-चार महिला आपापसात भांडताना दिसतात. हे भांडण इतकं वाढलं की महिलांनी एकमेकांचे केस पकडून एकमेकांना चप्पलने मारायला सुरुवात केली.
मुंबई: महिलांच्या भांडणाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ फक्त बघितलेच जात नाहीत तर ते तितकेच शेअर देखील केले जातात. एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जिथे तीन-चार महिला आपापसात भांडताना दिसतात. हे भांडण इतकं वाढलं की महिलांनी एकमेकांचे केस पकडून एकमेकांना चप्पलने मारायला सुरुवात केली. एका वृत्तानुसार, गेल्या रविवारी अमेरिकेतील लास वेगासमधील एका आलिशान हॉटेलमध्ये एका पार्टी दरम्यान त्यांच्यात हाणामारी झाली होती. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. या भांडणात चार महिला सहभागी होत्या. कुणी कुणाचे केस ओढत आहे, तर कोणी चप्पलने कुणाला मारत आहे.
ही लढाई का आणि कोणत्या कारणासाठी झाली याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला आपापसात भांडत आहेत. इथे कुणी कुणावर चप्पल फेकत आहे तर कोणी कुणाचे केस ओढत आहे. यावेळी हॉटेलमधील वातावरण एकदम तापले होते. अनेक जण त्यांचे व्हिडिओ बनवत असताना काही जण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते.
शेवटी एक व्यक्ती आणि सुरक्षा रक्षकाने ही भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान भांडण इतके वाढले होते की, पोलिसांना मध्येच येऊन महिलांना अटक करावी लागली. या भांडणाचं पुढे काय झालं, कशासाठी ही भांडणं झाली याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंटच्या माध्यमातून त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.