LPG च्या वाढलेल्या दराचा महिलांकडून अनोखा विरोध, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
एकीकडे कोरोना महामारीने व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत. त्याचबरोबर महागाईनेही त्यावर ताण आणला आहे. वास्तविक, एलपीजी 2 दिवसांपूर्वी पुन्हा महाग झाला आहे. एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याने लोकांच्या समस्याही वाढतात. म्हणूनच लोक गॅसच्या किमतींबाबत आपापल्या पद्धतीने विरोध करत आहेत, पण तेलंगणातील जमीकुंटाच्या महिलांनी एक नवीन मार्ग समोर आणला.
मुंबई : एकीकडे कोरोना महामारीने व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत. त्याचबरोबर महागाईनेही त्यावर ताण आणला आहे. वास्तविक, एलपीजी 2 दिवसांपूर्वी पुन्हा महाग झाला आहे. एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्याने लोकांच्या समस्याही वाढतात. म्हणूनच लोक गॅसच्या किमतींबाबत आपापल्या पद्धतीने विरोध करत आहेत, पण तेलंगणातील जमीकुंटाच्या महिलांनी एक नवीन मार्ग समोर आणला. येथे महिलांनी येथे नवरात्रीला सिलेंडरभोवती गरबा खेळून आपला निषेध व्यक्त केला.
एका अहवालानुसार, जमीकुंटाच्या महिलांनी पुन्हा घरगुती गॅसच्या किंमतीवर नाराजी व्यक्त करण्यासाठी ही पद्धत घेतली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिलांनी अनेक कलशांच्या मधोमध गॅस सिलिंडर ठेवले आणि नंतर त्याभोवती गरबा खेळला. गरबा खेळताना महिला गाणीही म्हणत होत्या. महिलांचा हा अनोखा निषेध पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. आता याच घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
येथे व्हिडिओ पहा-
#WATCH तेलंगाना: जम्मीकुंटा की महिलाओं ने LPG सिलेंडर और तेल की बढ़ती कीमतों के खिलाफ अनूठे तरीके से विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/Ok2GGprfeY
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2021
6 ऑक्टोबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवरील दर वाढवले होते. कंपन्यांनी सबसिडीशिवाय 14.2 किलो सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर, दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवरुन 899.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. त्याचबरोबर 5 किलोचा सिलिंडर आता 502 रुपयांना मिळणार आहे.
एकीकडे वाढती महागाई लोकांचं जीवन कठीण बनवत आहे. त्याचवेळी, लोक त्यांचे मत सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अनोखे मार्ग वापरत आहेत. महिलांनी केलेल्या अनोख्या कामगिरीचा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. म्हणूनच आता महिलांच्या विचित्र निषेधाचा व्हिडिओही लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. म्हणूनच लोक हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप शेअर करत आहेत.
संबंधित बातम्या :
Video: पाणी पिणाऱ्या सिंहाची कासवाने छेड काढली, त्यानंतर जे झालं, ते पाहून नेटकरी आवाक!