Kabaddi: कबड्डी कबड्डी…साडी नेसून कबड्डी कबड्डी कबड्डी!

| Updated on: Oct 08, 2022 | 11:57 AM

हा व्हिडीओ एकदम भन्नाट आहे. साडी नेसून कबड्डी कबड्डी करणाऱ्या अशा महिला तुम्ही कधीही पाहिल्या नसतील.

Kabaddi: कबड्डी कबड्डी...साडी नेसून कबड्डी कबड्डी कबड्डी!
women playing kabaddi
Image Credit source: Social Media
Follow us on

प्रो-कबड्डी लीगमुळे कबड्डी घराघरांत पोहचली. एक काळ असा होता की कबड्डी हा खेळ फक्त गल्लीबोळात दिसायचा, पण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांना ते कळू लागलं आहे. प्रो-कबड्डी लीगबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. कबड्डीची ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. यावेळी देशभरातून 12 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. बरं, तुम्ही लहानपणीच कबड्डी खेळली असेल. तसे पाहिले तर पुरुष सहसा कबड्डी खेळताना दिसतात किंवा मुलीही काही ठिकाणी छंद जोपासत खेळतात, पण साडी नेसून कबड्डी खेळणाऱ्या महिलांना तुम्ही कधी पाहिले आहे का? होय, असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एकदम भन्नाट आहे. साडी नेसून कबड्डी कबड्डी करणाऱ्या अशा महिला तुम्ही कधीही पाहिल्या नसतील.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला साडी नेसून कबड्डी कशी खेळत आहेत आणि त्यांना कबड्डी खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप गर्दी करतायत.

लोक त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि स्त्रियाही एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत असल्याप्रमाणे खेळण्यात व्यस्त आहेत. महिलांची ही कबड्डी छत्तीसगडिया ऑलिम्पिकचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

किंबहुना छत्तीसगडच्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगढिया ऑलिम्पिक सुरू करण्यात आले असून, त्यात गिली दांडा ते पिटुल, लंगडी शर्यत, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच आणि गोट्या इत्यादी 14 प्रकारच्या प्रादेशिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केलाय. 51 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.