मजुराच्या जुगाडाचा ‘हा’ Video पाहून तुम्हीही म्हणाल, हे IITमध्ये का शिकवलं जात नाही?
Desi Jugaad Video : जुगाडाच्या बाबतीत भारतीयांना तोड नाही. सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होणारे व्हिडिओ पाहून तर तुम्ही असे म्हणाल. कारण, जुगाड व्हिडिओच्या माध्यमातून येथे अशा गोष्टी केल्या जातात, ज्या पाहून दिग्गजही हैराण होतील.
Desi Jugaad Video : जुगाडाच्या बाबतीत भारतीयांना तोड नाही. सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होणारे व्हिडिओ पाहून तर तुम्ही असे म्हणाल. कारण, जुगाड व्हिडिओच्या माध्यमातून येथे अशा गोष्टी केल्या जातात, ज्या पाहून दिग्गजही हैराण होतील. कधी-कधी जगभरात भारतीय जुगाडच्या चर्चा होतात. याच प्रकारामध्ये जुगाडचा आणखी एक मजेदार (Funny) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हीही म्हणाल ‘खूप छान.’ व्हिडिओमध्ये एका मजुराने वाळू उपसा करण्यासाठी अशी शक्कल लढवली, की प्रवाशांना कारचा फील होत आहे. लोक त्या मजुराचे कौतुक करत आहेत. आता मजुरी मिळणे किती कठीण आहे, रेती आणि सिमेंटचे वजन उचलून मजुरांना अनेक मजली इमारतींवर चढावे लागत आहे, परंतु आजकाल व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून मजुरांनी ही युक्ती अवलंबली तर मजुरांचा त्रास कमी होईल.
कठोर परिश्रम आणि…
या जड कामात कठोर परिश्रम करावे लागतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की, एक मजूर वाळूची गोणी दोरीने बांधत आहे. त्यानंतर कामगार दोरीने लटकतो आणि वाळूची पोती वरच्या मजल्यावर जातात आणि थोड्या वेळाने दुसरा कामगार खाली येतो, त्यानंतर ती पोती वरच्या मजल्यावर जातात.
ट्विटरवर शेअर
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर ‘@nee_el’ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर यूझर्स या व्हिडिओवर खूप मजेदार प्रतिक्रियाही देत आहेत.
What IIT’s can’t teach? pic.twitter.com/IFdoRQSYIe
— enn gee ess (@nee_el) February 4, 2022
This is pure Indian intelligence we already have… that is why we had built temple, railway tracks, bridges, monuments over Mosqu€
— #Jay #देशभक्ति है ?? (@Dil_Se_Ree) February 5, 2022
#jugad #jugadu this can happen in regards Nadia only #JugaduKamlesh pic.twitter.com/sruRBfTDDY
— sanjay shah (@pritiesanjay) February 5, 2022
देसी जुगाड जिंदाबाद
एका यूझरने असे लिहिले, की देसी जुगाड जिंदाबाद. दुसर्या यूझरने कमेंट करत लिहिले, की ज्याने या जुगाडची कल्पना या व्यक्तीला दिली आहे तो खरोखर सक्षम व्यक्ती असेल. तिसर्याने लिहिले, की भारतात कुठेही जुगाड नाही, असे होऊ शकत नाही, याशिवाय बहुतेक यूजर्स इमोटिकॉन शेअर करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.