…म्हणून काश्मीरला म्हणतात पृथ्वीवरचा स्वर्ग! सर्वात मोठा कॅफे ‘Snowglu’चे Photos होतायत Viral

World's Largest Igloo Cafe : काश्मीरमधील गुलमर्ग येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या इग्लू कॅफेने अखेर हिवाळा संपेपर्यंत मार्च महिन्यात पर्यटकांसाठी दरवाजे उघडले आहेत. जम्मू-काश्मीर(Jammu Kashmir)मधील गुलमर्ग येथे सुरू झालेले इग्लू कॅफे (Igloo Cafe) पर्यटकांचे आकर्षण बनलेय.

...म्हणून काश्मीरला म्हणतात पृथ्वीवरचा स्वर्ग! सर्वात मोठा कॅफे 'Snowglu'चे Photos होतायत Viral
जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे सुरू झालेले इग्लू कॅफे - स्नोग्लू (सौ. बासित झरगर)
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 11:43 AM

World’s Largest Igloo Cafe : पर्यटकांचे आकर्षण म्हणजे जम्मू काश्मीर राज्य… काश्मीरमधील गुलमर्ग येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या इग्लू कॅफेने अखेर हिवाळा संपेपर्यंत मार्च महिन्यात पर्यटकांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. जम्मू-काश्मीर(Jammu Kashmir)मधील गुलमर्ग येथे सुरू झालेले इग्लू कॅफे (Igloo Cafe) पर्यटकांचे नवे आकर्षण बनले आहे. ‘स्नोग्लू’ (Snowglu) नावाचा कॅफे जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये उभारण्यात आला असून तो 37.5 फूट लांब आणि 44.5 फूट व्यासाचा आहे. इग्लूचे निर्माते सय्यद वसीम शाह यांनी दावा केला, की हा जगातील सर्वात मोठा इग्लू कॅफे आहे. ते म्हणाले, ‘मी ही संकल्पना काही वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये पाहिली होती, जिथे झोपायलाही आरामदायी अशी हॉटेल्स होती. मला वाटले गुलमर्गमध्ये खूप बर्फ आहे आणि ही संकल्पना इथे का सुरू करू नये? गेल्या वर्षीही त्यांनी इग्लू कॅफे बांधल्याचे सांगितले आणि ते आशियातील सर्वात मोठे कॅफे असल्याचा दावा त्यांनी केला.

‘स्वित्झर्लंडमध्ये सर्वात मोठे इग्लू कॅफे’

हॉटेलियर शाह म्हणाले, “यावर्षी, मी 37.5 फूट आणि 44.5 फूट व्यासाचे जगातील सर्वात उंच इग्लू कॅफे डिझाइन केले आहे.” ते म्हणाले, की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, सर्वात मोठे इग्लू कॅफे स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि त्याची उंची 33.8 फूट आणि व्यास 42.4 फूट आहे. तर, ते त्यापेक्षा मोठे आहे. गेल्या वर्षी कॅफेमध्ये चार टेबल्स होते आणि एकावेळी 16 लोक जेवू शकत होते, पण यावर्षी आणखी 10 टेबल्स ठेवल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

‘केले रात्रंदिवस काम’

सय्यद वसीम शाह म्हणाले की, ते पूर्ण होण्यासाठी 64 दिवस लागले आणि 25 जणांनी रात्रंदिवस काम केले. ते म्हणाले, की प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1,700 मनुष्य-दिवस लागले. त्याची जाडी पाच फूट आहे. आम्ही आशा करतो, की ते 15 मार्चपर्यंत सुरू होईल. हे कॅफे स्थानिक लोकांसोबतच रिसॉर्टला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. इग्लूमध्ये किंवा थंड होईपर्यंत अतिथी सुमारे एक तास घालवू शकतो. व्यवस्थापनाचा दावा आहे, की हा जगातील सर्वात मोठा इग्लू कॅफे आहे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला आहे. बर्फाचे घर किंवा बर्फापासून बनवलेल्या झोपडीला इग्लू म्हणतात.

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची छोटी मुलं चालवतायत रेस्टॉरंट; Video पाहून Anand Mahindraही भावुक, म्हणाले…

funny video viral : टेबलावर ठेवलेल्या प्लेटपर्यंत हात पोहोचत नव्हता, मग चिमुकल्यानं ‘असं’ लावलं डोकं

Road accident video : …अन् ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडकला ट्रक, अपघाताचा थरारक Video Viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.