AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात महागडे नाणे, किंमत तब्बल 192 कोटी रुपये, पाहा कोणासाठी तयार झाले

स्काय न्यूजने दिलेल्या बातमीनूसार या नाण्याचा आकार बास्केट बॉलच्या आकाराचा आहे. या नाण्याचा व्यास 9.6 इंच इतका आहे.

जगातील सर्वात महागडे नाणे, किंमत तब्बल 192 कोटी रुपये, पाहा कोणासाठी तयार झाले
the crown coin Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 3:47 PM

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : ईस्ट इंडीया कंपनीने क्वीन एलीझाबेथ – || पहिल्या पुण्यतिथी निमित्त एक नाणं जारी करण्यात आले आहे. त्याची किंमतच 192 कोटी रुपये आहे. या नाण्याची निर्मिती 4 किलोग्रॅम सोन्यापासून बनविले आहे. यात सुमारे 6 हजार 400 हीरे जडविलेले आहेत. या बेसबॉलच्या आकाराच्या या नाण्याचे नाव ‘द क्राऊन कॉईन’ असे ठेवण्यात आले असून आतापर्यंतचे ते सर्वात महागडं नाणं म्हटलं जात आहे. आतापर्यंत डबल ईगल या नावाच्या नाण्याला जगातले सर्वात महागडे नाणं मानलं जात होते. या डबल इगलची किंमत 163 कोटी रुपये होती. या नाण्याचे डीझाईन ऑगस्टस सेंट गॉडंस यांनी 1933 मध्ये केली होती.

स्काय न्यूजने दिलेल्या बातमीनूसार या नाण्याचा आकार बास्केट बॉलच्या आकाराचा आहे. या नाण्याचा व्यास 9.6 इंच इतका आहे. या नाण्यावर दिवंगत सम्राटाचं छायाचित्रेही आहेत. प्रसिद्ध चित्रकार मॅरी गिलिक, अर्नोल्ड माचिन, राफेल मॅकलॉफ आणि इयान रॅंक-ब्रॉडली यांनी ही चित्रे काढली आहेत. या नाण्याला तयार करण्यासाठी भारत, जर्मनी, युके, श्रीलंका आणि सिंगापूरच्या कलाकारांनी हातभार लावला आहे. या नाण्याला ईस्ट इंडीया कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ संजीव मेहता यांनी जारी केले आहे.

क्वीन एलिझाबेथ

8 सप्टेंबर 2022 रोजी इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ हीचे निधन झाले. एक वर्षांनंतर ईस्ट इंडीया कंपनीने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हे नाणं तयार केले आहे. या नाण्याच्या कडे क्वीन एलिझाबेथ यांची प्रसिद्ध वाक्यं कोरण्यात आली आहेत. 24 ऑगस्ट 1608 मध्ये ईस्ट इंडीया कंपनीचे पहिले जहाज सुरतच्या किनाऱ्याला लागले होते. यास ईस्ट इंडीया कंपनीचे आगमन मानले जाते. व्यापारासाठी आलेले इंग्रज नंतर 200 वर्षे भारतावर राज्य करतील याची कल्पनाही कोणाला आली नव्हती. या घटनेने भारताचा भुगोल आणि इतिहास दोन्हींना बदलून टाकले.

ईस्ट इंडीया कंपनीची स्थापना

16 व्या शतकात इंग्रजांना व्यापारासाठी मोठ्या बाजाराची गरज होती. तेव्हा व्यापाऱ्यांनी भारत व्यापार करण्याची परवानगी मागितली. त्यांनी 1600 मध्ये या कंपनीची स्थापना केली. त्यांना साऊथ आणि साऊथ ईस्ट आशियात व्यापार करायचा होता. म्हणून कंपनीचे नाव ईस्ट इंडीया ठेवले. 125 भागधारक आणि 72 हजार स्टर्लिंग पाऊंड भांडवलातून कंपनी तयार झाली. या कंपनीला ब्रिटनच्या शाही परिवाराचे संरक्षण होते.

'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.