रावणाच्या लंकेत सापडले जगातील सर्वात मोठे नीलम रत्न, किंमत ऐकून अवाक व्हाल
श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून 65 किमी दूर असणाऱ्या रत्नपुरा गावात जागातील सर्वात मोठे रत्न सापडले आहे. हे रत्न निलम असून या निलम खड्याचे वजन 310 किलो इतके आहे.
मुंबई : श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून 65 किमी दूर असणाऱ्या रत्नपुरा गावात जागातील सर्वात मोठे रत्न सापडले आहे. हे रत्न निलम असून या निलम खड्याचे वजन 310 किलो इतके आहे. रत्नांच्या बाजारात याला कोरन्डम ब्लू म्हणून ओळखले जाते.
किंमत ऐकून थक्क व्हाल समोर आलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत एका घराच्या अंगणात खोदकाम करताना जगातील सर्वात मोठ्या आकाराचे निलम रत्नं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. येथील रत्नपुरा हा परिसर निलम खड्यांच्या साठ्यांसाठीच ओळखला जातो. येथील हिरे व्यापारी गोमेज यांनी आपल्या घराच्या अंगणात काम काढले होते. तेव्हा कामगारांना खोदकाम सुरु असताना एक मोठा दगड मिळाला. हा दगड साधासुधा नसून ते जगातील सर्वाधिक आकाराचे निलम रत्न असल्याचा उलगडा नंतर झाला. या दगडाची किंमत साधारण 700 कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.
तज्ज्ञांची मत तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊनमुळे येथील रत्न उद्योगाला गेल्या वर्षभरापासून मोठा फटका बसला आहे. पण या रत्नाच्या शोधामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांचे लक्ष पुन्हा एकदा श्रीलंकेकडे वळेल. एवढा मोठा नीलम मी याआधी कधीही पाहिला नव्हता. तो 400 दशलक्ष वर्षांपूर्वी बनवला गेला असावा अशीही शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वजन ऐकून थक्क व्हाल या निलम खड्याचे वजन 310 किलो इतके आहे. रत्नांच्या बाजारात याला कोरन्डम ब्लू म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून 65 किमी दूर असणाऱ्या रत्नपुरा गावात हे रत्न सापडले आहे. सर्व कडे याच रत्नाची चर्चा आहे.
ज्योतिषशास्त्रातील नीलम रत्नाचे महत्त्व ज्योतिषशास्त्रात नीलम रत्न हे अतिशय शक्तिशाली मानले जाते. हे रत्न शनि ग्रहाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की नीलममध्ये इतकी शक्ती आहे की ती एखाद्या व्यक्तीला रंक ते राजा बनवू शकते. पण, जर गरज नसलेल्या व्यक्तीने नीलम परिधान केले तर हे रत्न त्याचे अशुभ परिणाम देऊ लागते आणि त्या व्यक्तीचा संपूर्ण विनाश होते. अशी मान्यता आहे.
इतर बातम्याः