ओल्ड इज ए गोल्ड! जुनं नाणं कुठे आणि कसं विकायचं माहितेय का? जाणून घ्या जुन्या 2 रुपयांच्या नाण्याची किंमत
लोक जुन्या नोटा आणि नाणी ठेवतात, पण या जुन्या नोटा आणि नाणी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का?
‘ओल्ड इज ए गोल्ड’ म्हणजेच जुनं ते सोनं! ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. आपल्याकडे जुन्या असलेल्या काही मौल्यवान वस्तू असतील तर त्याची किंमत सध्या लक्षणीयरीत्या वाढते. अनेकदा आपण पाहिले आहे की लोक जुन्या नोटा आणि नाणी ठेवतात, पण या जुन्या नोटा आणि नाणी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? ज्या लोकांकडे पुरातन वस्तूंचा संग्रह आहे त्यांना नक्कीच माहित आहे की त्यांना चांगली किंमत मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जुन्या 2 रुपयांच्या नाण्याची किंमत किती मिळू शकते.
ई-कॉमर्स वेबसाइटवर जुन्या आणि पुरातन नाणी आणि नोटांची विक्री सुरू असते. ज्यांच्याकडे जुन्या नाण्यांचा संग्रह आहे, ते त्यांच्या लॉगिनमध्ये एक चित्र आणि अंदाजे रकमेची पोस्ट तयार करतात.
जर कोणाकडे 2 रुपयांचं जुनं नाणं असेल, ज्यावर भारताचा नकाशा तयार करून राष्ट्रीय एकात्मता हिंदीत आणि राष्ट्रीय एकात्मता इंग्रजीत छापली गेली असेल तर त्याचं मूल्य लक्षणीय वाढलंय. Quikr.com वर हे नाणे विकून हजारो रुपये मिळू शकतात. काही वेळा काही लोक लाख रुपयांपर्यंत पैसे द्यायला तयार असतात, पण ते नाणं अनोखं आणि जुनं असावं.
क्विकरची ही वेबसाइट म्हणजे पैशासाठी एकमेकांशी व्यवहार करणारे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील केवळ एक सेतू आहे. जर दोघांमध्ये करार झाला तर ते एकमेकांना कितीही रक्कम देऊ शकतात.
एका यूजरने आपले जुने नाणे विकण्यासाठी पाच लाख रुपयांची बोली लावलये. त्याने लिहिले की, हे एक खूप जुने आणि अद्वितीय नाणे आहे आणि मला ते 5 लाख रुपयांना विकायचे आहे.
अशी सगळी नाणी तुम्हाला वेबसाइटवर मिळतील, जी अतिशय अनोखी आहेत. तुमच्याकडेही असे जुने नाणे असेल तर अशा ई-कॉमर्स वेबसाइटला भेट देऊन साइन अप करा आणि नाण्यांचे फोटो अपलोड करा. शेवटी आपली रक्कम प्रविष्ट करा. जेव्हा जेव्हा युजरला तुमचं नाणं विकत घ्यायचं असेल, तेव्हा तो तुमच्याशी संपर्क साधेल.